**कृषी अधिकाऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकांसाठी गुणनियंत्रण निरीक्षकपद**
**कृषी अधिकाऱ्यांना बियाणे, खते, किटकनाशकांसाठी गुणनियंत्रण निरीक्षकपद**
**KDM NEWS प्रतिनिधी**पुणे, दि. २३ जून २०२५: महाराष्ट्र कृषी आयुक्तालयाने तालुका कृषी कार्यालयातील कृषी अधिकाऱ्यांना बियाणे, खते आणि किटकनाशकांचे गुणनियंत्रण निरीक्षक म्हणून नियुक्त केले आहे. कृषी आयुक्त सूरज मांढरे यांच्या २३ जून २०२५ च्या आदेशानुसार, बियाणे अधिनियम १९६६, खत नियंत्रण आदेश १९८५ आणि किटकनाशक अधिनियम १९६८ च्या तरतुदींनुसार हा निर्णय घेण्यात आला.
**निरीक्षकांच्या जबाबदाऱ्या**
- निविष्ठा उत्पादक, विक्रेत्यांना परवाना मार्गदर्शन.
- शेतकऱ्यांना निविष्ठांच्या दर्जाबाबत प्रशिक्षण आणि प्रचार.
- बियाणे, खते, किटकनाशकांचे नमुने गोळा करून प्रयोगशाळेत तपासणी.
- अप्रमाणित नमुने आणि बेकायदेशीर विक्रीवर कायदेशीर कारवाई.
- निविष्ठांच्या उपलब्धता आणि पुरवठ्याचे नियोजन.
- तालुका शेतकरी तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव म्हणून काम.
**प्रशिक्षण आणि लक्ष्यवाटप**
खरीप हंगामाला सुरुवात झाल्याने निरीक्षकांनी तातडीने काम सुरू करावे. विभागीय कृषी सहसंचालकांनी प्रशिक्षण आयोजित करावे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय निविष्ठा तपासणीचे लक्ष्य वाटप करावे.
**पूर्व अधिकार संपुष्टात**
तालुका कृषी अधिकाऱ्यांचे निरीक्षक म्हणून असलेले अधिकार रद्द झाले असून, त्यांच्याकडील पितळी सौल नव्या निरीक्षकांना हस्तांतरित होईल. गुणनियंत्रण कोड क्र MEMS कृषी अधिकाऱ्यांसाठी (गुणनियंत्रण) आरक्षित आहे.
**शेतकऱ्यांना लाभ**
शेतकऱ्यांना दर्जेदार निविष्ठा मिळण्यास मदत होईल. तक्रारींसाठी टोल-फ्री क्रमांक १८००-२३३-४००० वर संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदीत काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी