**बार्शी तालुक्यात गणेशोत्सव पुरस्कारांसाठी तालुका समिती स्थापन**
**बार्शी तालुक्यात गणेशोत्सव पुरस्कारांसाठी तालुका समिती स्थापन**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी, दि. ३० ऑगस्ट २०२५ (प्रतिनिधी):** महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला 'राज्य महोत्सव' म्हणून मान्यता दिल्यानंतर, सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्यासाठी विजेत्यांची निवड करणारी तालुका स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. तहसीलदार एफ. आर. शेख यांच्या अध्यक्षतेखालील या समितीत सदस्य सचिव आणि दोन अशासकीय सदस्यांची नेमणूक करण्यात आली असून, समितीला शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
शासनाच्या १४ ऑगस्ट २०२५ च्या निर्णयानुसार गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. त्यानुसार, सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या २५ ऑगस्टच्या पत्रान्वये तालुका समिती स्थापन करण्याचे आदेश देण्यात आले. बार्शी तहसीलदारांनी २८ ऑगस्ट रोजी जारी केलेल्या आदेशात समितीत सदस्य सचिव म्हणून बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी अंकुश कुकडे यांची निवड करण्यात आली. अशासकीय सदस्य म्हणून शंकर बाळासाहेब वाघमारे (संगीत विशारद, शंकरा संगीत विद्यालय संचालक, आणि रामचंद्र हरिदास इकारे (शिक्षक चित्रकार, सुलाखे हायस्कूल, यांची नेमणूक झाली.
पूर्ण समिती खालीलप्रमाणे आहे:
१. एफ. आर. शेख (तहसीलदार, बार्शी) - अध्यक्ष
२. मुख्याधिकारी, नगरपरिषद बार्शी/वैराग - सदस्य
३. उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, बार्शी - सदस्य
४. पोलीस निरीक्षक वैराग/सहायक पोलीस निरीक्षक बार्शी तालुका/पांगरी - सदस्य
५. शंकर बाळासाहेब वाघमारे - अशासकीय सदस्य
६. रामचंद्र हरिदास इकारे - अशासकीय सदस्य
७. बालाजी अंकुश कुकडे (पोलीस निरीक्षक, बार्शी शहर) - सदस्य सचिव
समितीला तालुक्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मूल्यमापनासाठी शासनाच्या कार्यपद्धतीनुसार नियोजन करणे आणि विजेत्यांची निवड करणे अपेक्षित आहे. राज्य सरकारने यंदा गणेशोत्सवासाठी १,८०० भजनी मंडळांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे अनुदान जाहीर केले असून, मंडळ स्पर्धांसाठी ड्रोन शो आणि आंतरराष्ट्रीय प्रसार यासारख्या योजना राबवल्या जाणार आहेत. बार्शी तालुक्यातील मंडळांना पुरस्कार वितरणासाठी समितीची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या