**सोलापूरात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान'ची कार्यशाळा : थकीत कर एकरकमी भरल्यास ५०% सवलत - पालकमंत्री जयकुमार गोरे**

**सोलापूरात 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान'ची कार्यशाळा : थकीत कर एकरकमी भरल्यास ५०% सवलत - पालकमंत्री जयकुमार गोरे** 

**KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, दि. ३१ (प्रतिनिधी) :** ग्रामपंचायतींना सक्षम आणि गावांना समृद्ध करण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान' अंतर्गत थकीत कर एकरकमी भरल्यास ५० टक्के सवलत देण्यात येईल, अशी घोषणा ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली. सलग पाच वर्ष कर न भरणाऱ्यांना ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारीस बंदी घालण्याचा इशाराही त्यांनी दिला.

ग्रामविकास विभागातर्फे रविवारी हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित कार्यशाळेत गोरे बोलत होते. यावेळी यशदाचे उपमहासंचालक मल्लिनाथ कलशेट्टी, आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, राजू खरे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अमोल जाधव, सुर्यकांत भुजबळ, शिक्षणाधिकारी सचिन जगताप, कादर शेख, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, नरेंद्र खराडे, समाज कल्याण अधिकारी सुलोचना सोनवणे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती शरद गुट्टे आदी उपस्थित होते.

या अभियानात राज्यातील सुमारे ६,५०० गावे पहिल्या टप्प्यात सहभागी होतील, त्यापैकी १,९२० गावांना पुरस्कार मिळतील. विजेत्या तीन ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते गौरव केला जाईल, असे गोरे यांनी सांगितले. अभियान राजकारणमुक्त ठेवून गावांच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रत्येक गावाला नोडल अधिकारी नेमण्यात येईल आणि उत्कृष्ट काम करणाऱ्या गावांना आमदारांच्या शिफारशीशिवाय निधी उपलब्ध करू, असेही त्यांनी जाहीर केले.

"ग्रामपंचायतींनी सर्व योजना १०० टक्के अंमलात आणाव्यात. गाव स्वच्छ, मजबूत आणि सर्वांगीण विकसित करावे. महिलांसाठी शौचालये, अंगणवाड्या, शाळा, स्मशानभूमी, रस्ते यांचा विकास करावा. सरपंचांनी सक्रिय सहभाग घेऊन दानशूर, नोकरदार आणि सामाजिक कार्यकर्त्यांना जोडावे," असे भावनिक आवाहन गोरे यांनी केले.

कार्यक्रमात आषाढी यात्रेतील उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा गोरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. गोरे यांनी यात्रेतील स्वत:च्या अनुभवांचा उल्लेख करत टीमवर्क आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. आमदार देशमुख यांनी अभियानाचे कौतुक करत 'पाच पी' संकल्पना स्पष्ट केली, तर आवताडे यांनी मतदारसंघात अभियान प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार व्यक्त केला.

प्रास्ताविक संदीप कोहिनकर यांनी केले, सूत्रसंचालन सचिन जाधव आणि ऐश्वर्या हिब्बारे यांनी, तर आभार सुर्यकांत भुजबळ यांनी मानले. कार्यक्रमासाठी प्रशासकीय अधिकारी झेड ए शेख, वैभव आहाळे, अमोल महिंद्रकर, गणेश हुच्चे, काटकर यांच्यासह ग्रामपंचायत टीमने परिश्रम घेतले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल