**बार्शीतील मराठा समाज मुंबईत; जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा**
**बार्शीतील मराठा समाज मुंबईत; जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा**
**KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, २९ ऑगस्ट : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बार्शीतील सकल मराठा समाज मोठ्या संख्येने आझाद मैदानावर दाखल झाला. ॲड. गणेश हांडे, शुभम चव्हाण, विकी शिंदे, निलेश शिंदे, रोहित पाटील, विश्वजीत पवार यांच्यासह अनेक मराठा कार्यकर्ते उपस्थित होते. पावसातही आंदोलन अखंड सुरू राहिले.
खासदार ओमराजे निंबाळकर, बजरंग सोनवणे, आमदार प्रकाश सोळंके, संदीप क्षिरसागर यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला. महाराष्ट्रभरातून आलेल्या आंदोलकांमुळे मुंबईत ५० किमीच्या वाहनांच्या रांगा लागल्या, शासकीय यंत्रणा विस्कळीत झाली. मराठा समाजाने रस्त्यावर कब्जा करत "ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे", "जय भवानी, जय शिवाजी" अशा घोषणा दिल्या. आंदोलकांनी स्थानिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली. "आरक्षण मिळेपर्यंत माघार नाही," असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. #मराठा_आरक्षण
KDM NEWS प्रतिनिधी
<script async type="application/javascript"
src="https://news.google.com/swg/js/v1/swg-basic.js"></script>
<script>
(self.SWG_BASIC = self.SWG_BASIC || []).push( basicSubscriptions => {
basicSubscriptions.init({
type: "NewsArticle",
isPartOfType: ["Product"],
isPartOfProductId: "CAowh_W9DA:openaccess",
clientOptions: { theme: "light", lang: "en" },
});
});
</script>
टिप्पण्या