**धाराशिव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: येडशी टोलनाक्याजवळील किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा जप्त**
**धाराशिव ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई: येडशी टोलनाक्याजवळील किराणा दुकानात प्रतिबंधित गुटखा जप्त**
**KDM NEWS प्रतिनिधी**धाराशिव, २८ ऑगस्ट २०२५: धाराशिव ग्रामीण पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे येडशी टोलनाक्याजवळील शिवतेज किराणा अँड जनरल स्टोअर्सवर छापा टाकून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला, सुगंधित सुपारी आणि तंबाखूचा साठा जप्त केला. एकूण २०,३३७ रुपयांच्या मुद्देमालासह दुकानदार प्रशांत सुरवसे (वय ३०, रा. इंगळे गल्ली, येडशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२.२८ वाजता झालेल्या या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक बनसोडे, चालक पोहेकॉ सुरवसे आणि होमगार्ड बनसोडे यांच्या पथकाने दोन पंचांच्या साक्षीने दुकानाची झडती घेतली. काउंटरच्या मागे पांढऱ्या नायलॉनच्या पोत्यांमध्ये लपवलेला मुद्देमाल आढळला. जप्त केलेल्या वस्तूंचे तपशील असे:
- राजनिवास सुगंधित पान मसाला: १४ पाऊच, प्रत्येकी २०० रुपये, एकूण २,८०० रुपये.
- लाल गोवा कंपनीचा गुटखा: १० पाऊच, प्रत्येकी १८० रुपये, एकूण १,८०० रुपये.
- विमल पान मसाला (मोठा): १० पाऊच, प्रत्येकी १९८ रुपये, एकूण १,९८० रुपये.
- बादशहा कंपनीचा गुटखा: २७ पाऊच, प्रत्येकी १०० रुपये, एकूण २,७०० रुपये.
- VI तंबाखू: ३१ पाऊच, प्रत्येकी २२ रुपये, एकूण ६८२ रुपये.
- डायरेक्टर स्पेशल पान मसाला: २७ पाऊच, प्रत्येकी २५० रुपये, एकूण ६,७५० रुपये.
- प्रीमियम शॉट ९९९ लग्झरी च्यूइंग तंबाखू: २९ पाऊच, प्रत्येकी १२५ रुपये, एकूण ३,६२५ रुपये.
पोलिस निरीक्षकांच्या आदेशानुसार गेल्या ८ महिन्यांपासून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात नेमणुकीवर असलेले पोअं रवींद्र राजेंद्र आरसेवाड (वय ३४, )यांनी ही फिर्याद नोंदवली. मुद्देमाल सीलबंद करून अन्न व औषध प्रशासन विभागाकडे तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध भा.दं.वि. कलम १८८, २७२, २७३, २७४, २७५ आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल झाला.
पोलिसांनी सांगितले की, अशा प्रतिबंधित पदार्थांच्या विक्रीविरुद्ध कारवाई सुरू राहणार असून, नागरिकांना गुप्त माहिती देण्याचे आवाहन केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या