**बार्शी शहर पोलिसांच्या तत्परतेने हरवलेला मोबाईल मालकाकडे परत**
**बार्शी शहर पोलिसांच्या तत्परतेने हरवलेला मोबाईल मालकाकडे परत**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी : शहर पोलिस ठाण्याच्या जलद कारवाई आणि प्रामाणिक नागरिकांच्या मदतीमुळे हरवलेला मोबाईल त्याच्या मूळ मालकाकडे सुपूर्द करण्यात आला. आदर्शनगर, नागणे प्लॉट येथील रहिवासी संतोष माणिक काळे यांचा मोबाईल काही दिवसांपूर्वी हरवला होता. त्यांनी बार्शी शहर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती.
शेलगाव येथील एका वयोवृद्ध व्यक्तीला हा मोबाईल सापडला. मालकाची ओळख नसल्याने त्यांनी तो घरी आणून नातू सचिन शिंदे यांना दाखवला. सचिन शिंदे यांनी जबाबदारी ओळखून मोबाईल बार्शी शहर पोलिस ठाण्यात जमा केला.
पोलिसांनी तपास करून मोबाईल मालकाला शोधले. बार्शी शहर पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या हस्ते मोबाईल संतोष माणिक काळे यांना सुपूर्द करण्यात आला. यावेळी कर्मचारी संतोष जाधवर, सचिन देशमुख आणि सायबर विभागातील रतन जाधव उपस्थित होते.
मोबाईल परत मिळालेल्या संतोष काळे म्हणाले, "पोलिसांच्या तत्परतेमुळे आणि प्रामाणिक नागरिकांच्या सहकार्यामुळे हरवलेली वस्तू परत मिळाली. यामुळे पोलिसांवरील विश्वास वाढला."
पोलिसांचे आवाहन : हरवलेल्या वस्तू सापडल्यास तातडीने पोलिस ठाण्यात जमा करा. अशा कृतींमुळे समाजातील विश्वास मजबूत होतो.
KDM NEWS प्रतिनिधी
<script async type="application/javascript"
src="https://news.google.com/swg/js/v1/swg-basic.js"></script>
<script>
(self.SWG_BASIC = self.SWG_BASIC || []).push( basicSubscriptions => {
basicSubscriptions.init({
type: "NewsArticle",
isPartOfType: ["Product"],
isPartOfProductId: "CAowh_W9DA:openaccess",
clientOptions: { theme: "light", lang: "en" },
});
});
</script>
टिप्पण्या