**‘श्रीगणेशा आरोग्याचा’ : गणेशोत्सवात मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा शुभारंभ**

**‘श्रीगणेशा आरोग्याचा’ : गणेशोत्सवात मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा शुभारंभ** 
**KDM NEWS प्रतिनिधी**मुंबई, दि. २८ ऑगस्ट २०२५ : गणेशोत्सवानिमित्त महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांमध्ये ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष उपक्रमांतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महत्त्वाकांक्षी मोहिमेचा शुभारंभ मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने हाती घेतला आहे.

या उपक्रमात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, जिल्हा रुग्णालये आणि धर्मादाय रुग्णालयांशी संलग्न तज्ज्ञ डॉक्टरांचा सक्रिय सहभाग आहे. विशेष म्हणजे, राज्यातील अनेक गणेश मंडळांनीही या सामाजिक कार्यात उत्साहाने सहभाग घेतला आहे.

या शिबिरांद्वारे नागरिकांना केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार आहे. तपासणीदरम्यान आजार आढळणाऱ्या रुग्णांना संबंधित योजनांतर्गत मोफत उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने आरोग्य जागृती आणि उपचाराची ही अनोखी मोहीम सामान्य नागरिकांसाठी व वरदान ठरणार आहे.

‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम गणेशोत्सवाला सामाजिक दायित्वाची जोड देत असून, #महागणेशोत्सव आणि #राज्यमहोत्सव अंतर्गत यंदाच्या उत्सवाला विशेष रंगत येणार आहे.

#श्रीगणेशाआरोग्याचा #मुख्यमंत्रीसहाय्यतानिधी #गणेशोत्सव२०२५ #महाराष्ट्र

KDM NEWS प्रतिनिधी 

<script async type="application/javascript"
        src="https://news.google.com/swg/js/v1/swg-basic.js"></script>
<script>
  (self.SWG_BASIC = self.SWG_BASIC || []).push( basicSubscriptions => {
    basicSubscriptions.init({
      type: "NewsArticle",
      isPartOfType: ["Product"],
      isPartOfProductId: "CAowh_W9DA:openaccess",
      clientOptions: { theme: "light", lang: "en" },
    });
  });
</script>


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल