**"बार्शीच्या शेतकऱ्यांसाठी मा.आ.राऊतांची मंत्रालयात ; अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी तात्काळ मदत व विमा निकष पूर्ववत करण्याची मागणी"**

**"बार्शीच्या शेतकऱ्यांसाठी मा.आ.राऊतांची मंत्रालयात ; अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी तात्काळ मदत व विमा निकष पूर्ववत करण्याची मागणी"** 

**KDM NEWS **मुंबई/बार्शी, दि. २३ सप्टेंबर २०२५** (विशेष प्रतिनिधी): सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. चांदणी नदीला आलेल्या महापुरामुळे बेलगाव, मांडेगाव, आगळगाव, धसपिंपळगाव, खडकलगाव, देवगाव, कांदलगावसह अनेक गावांमध्ये पाणी घुसले, तर कपाशी, सोयाबीनसह खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शेतजमिनी, विहिरी, शेतरस्ते आणि पाणंदी धरणांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राजाभाऊ राऊत यांनी मंगळवारी मंत्रालयात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कृषिमंत्री दत्ता मामा भारणे आणि रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले यांची भेट घेऊन तात्काळ भरघोस मदतीची मागणी केली.
मंत्रालयातील बैठकीत माजी आमदार राऊत यांनी अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची सविस्तर माहिती देताना शेतकऱ्यांसाठी विमा निकष पूर्ववत करण्याची, ऑनलाइन तक्रार नोंदवण्याची सुविधा देण्याची आणि पीक कापणी प्रयोग न लावता नैसर्गिक आपत्तीच्या धर्तीवर विमा भरपाई देण्याची मागणी कृषिमंत्री भरणे यांच्याकडे केली. खरीप हंगाम २०२५-२६ साठी विमा कंपन्यांनी बदललेले निकष शेतकऱ्यांना अडचणीत टाकत असल्याचे सांगत, पीकविमा भरलेल्या शेतकऱ्यांना थेट मदत मिळावी असेही त्यांनी ठामपणे सांगितले. महसूल मंत्री बावनकुळे यांच्याकडे शेतजमिनी, शेतरस्ते आणि पाणंदी बांधकामांचे नुकसान भरून काढण्यासाठी तात्काळ निधीची मागणी केली.

नुकसानभरपाईवर सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगताना माजी आमदार राऊत म्हणाले, "बार्शी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी खचून जाऊ नये. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून भरपाई देण्याचे आदेश द्यावेत. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मी सतत प्रयत्न करत आहे." रोजगार हमी मंत्री गोगावले यांनी येत्या दोन दिवसांत बार्शी तालुक्याला भेट देऊन नुकसानाची पाहणी करणार असल्याचे आश्वासन दिले. यामुळे शेतकऱ्यांमध्ये काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

जिल्हा प्रशासनाने सांगितल्याप्रमाणे, बार्शी तालुक्यात २७०० हून अधिक शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून, एकूण २० हून अधिक गावे प्रभावित आहेत. पावसाचा जोर कायम असल्याने पंचनामा प्रक्रिया वेगवान करण्यात आली असली, तरी शेतकऱ्यांकडून तात्काळ मदतीची मागणी तीव्र झाली आहे. राज्य सरकारने यापूर्वीच मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सूचनेनुसार मदत जाहीर केली असली, तरी विमा प्रक्रियेत अडथळे येत असल्याने माजी आमदार राऊत यांची ही भेट महत्त्वाची ठरली.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल