*बार्शी भूषण डॉ. बबनराव यशवंतराव यादव यांना वाढदिवसानिमित्त डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून शुभेच्छा**
**बार्शी भूषण डॉ. बबनराव यशवंतराव यादव यांना वाढदिवसानिमित्त डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेकडून शुभेच्छा**
**KDM NEWS किरण माने **बार्शी, दि. २७ सप्टेंबर २०२५** – वैद्यकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘बार्शी भूषण’ म्हणून गौरवले गेलेले डॉ. बबनराव यशवंतराव यादव यांच्या वाढदिवसानिमित्त डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, बार्शी तालुका आणि संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांच्यासह कार्यकारिणीने हार्दिक शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. यावेळी संघटनेचे तालुका अध्यक्ष गणेश शिंदे, सचिव किरण माने, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले यांनीही डॉ. यादव यांच्या कार्याचा गौरव करत शुभेच्छा दिल्या.
डॉ. यादव यांनी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष म्हणून गेल्या ३४ वर्षांत संस्थेला आधुनिक सुविधांनी सुसज्ज करत देशपातळीवर नावलौकिक मिळवून दिले आहे. वैद्यकीय क्षेत्रात त्यांनी १९८१ मध्ये सहा खाटांच्या आरोग्यमंदिराची सुरुवात करून आज ३५० खाटांचे ‘जगदाळे मामा हॉस्पिटल’ उभारले, जे गोरगरीब रुग्णांसाठी आधारस्तंभ आहे. बार्शी कॅन्सर हॉस्पिटल, रामभाई शहा रक्तपेढी, भगवंत देवस्थान आणि इंडियन रेडक्रॉस सोसायटी यांसारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे.
डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने म्हणाले, “डॉ. यादव यांचे बार्शीच्या सर्वांगीण विकासातील योगदान प्रेरणादायी आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि सत्कार्याची निरंतर प्रेरणा लाभो, अशी प्रार्थना करतो.” तालुका अध्यक्ष गणेश शिंदे यांनी सांगितले, “डॉ. यादव यांचे वैद्यकीय आणि सामाजिक कार्य आम्हा सर्वांसाठी मार्गदर्शक आहे.” सचिव किरण माने, राष्ट्रीय समन्वयक मुरलीधर चव्हाण आणि महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले यांनीही डॉ. यादव यांच्या सेवाभावी वृत्तीला सलाम करत शुभेच्छा संदेश दिले.
संघटनेच्या बार्शी तालुका कार्यकारिणीने डॉ. यादव यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या वाढदिवसाला शुभेच्छांचा वर्षाव केला. बार्शीतील नागरिकांनीही त्यांच्या माणुसकी आणि सेवाभावाला मानवंदना देत वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
KDM NEWS
Kiran mane
8698707909
टिप्पण्या