**बार्शीत नवरात्र मिरवणुकीत लेजर लाइटचा वापर; राज कमल बँडविरुद्ध गुन्हा दाखल**

**बार्शीत नवरात्र मिरवणुकीत लेजर लाइटचा वापर; राज कमल बँडविरुद्ध गुन्हा दाखल** 

**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी (सोलापूर), २७ सप्टेंबर २०२५ :** सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या स्पष्ट आदेशानुसार नवरात्रोत्सवात डीजे, डॉल्बी आणि लेजर लाइटच्या वापरावर बंदी असतानाही बार्शीतील एका बँडने मिरवणुकीत लेजर लाइटचा वापर केल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी राज कमल बँडचे मालक मनोज अब्रुशी शिंगनाथ यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, लेजर लाइट जप्त करण्यात आली आहे.

घटना २६ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० वाजता वैद्य वस्ती, परांडा रोडवर घडली. नवरात्र देवी उत्सवानिमित्त गुंड प्लॉट ते तुकाई देवी असा हार मिरवणुकीचा कार्यक्रम सुरू असताना राज कमल बँडच्या वाहनावर लेजर लाइट लावलेली दिसून आली. बार्शी शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुकडे, सपोफौ वरपे, पोकाँ बरबडे आणि चापोकाँ नागरगोजे यांच्या पथकाने पेट्रोलिंग करताना हे लक्षात आले. दोन पंचांसमक्ष लेजर लाइट ताब्यात घेण्यात आली.

सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांनी २० सप्टेंबर २०२५ रोजी जारी केलेल्या आदेशानुसार (जा.क्र.२०२५/डीसीबी-२/आर आर-५७८३/२५) २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नवरात्र मिरवणुकीत डॉल्बी, डीजे आणि लेजर लाइटच्या वापरावर पूर्ण बंदी आहे. हे आदेश सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी आहेत, कारण अशा प्रखर प्रकाशामुळे वाहनचालकांचे डोळे दिपून अपघात होऊ शकतात आणि लहान मुले तसेच वयोवृद्धांच्या डोळ्यांना इजा पोहोचू शकते. बँडला पारंपरिक वाद्यांसाठीच स्पीकर परवाना (क्र. ७५/२०२५) देण्यात आला होता, परंतु त्याचा भंग झाला.

पोलिस हवालदार कादर सायबा तांबोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गु. रजि. नं. ७८८/२०२५ दाखल करण्यात आला. बार्शी शहर पोलिस ठाण्याने आवाहन केले आहे की, नवरात्रोत्सवात पारंपरिक वाद्यांचाच वापर करावा आणि बंदीचे काटेकोर पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई होईल.

KDM NEWS प्रतिनिधी 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल