**सुयश विद्यालयाचा धक्कादायक प्रकार: जिल्हाधिकारी आदेश धुडकावून शाळा सुरू, मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल!**

**सुयश विद्यालयाचा धक्कादायक प्रकार: जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश धुडकावून शाळा सुरू, मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल!** 

**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी प्रतिनिधी** | दि. २५ सप्टेंबर २०२५ सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे २३ सप्टेंबरला ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली असताना बार्शीतील सुयश विद्यालयाने हा आदेश धुडकावला. या प्रकरणी पंचायत समितीचे प्रभारी गटशिक्षण अधिकारी बालाजी देवराव नाटके यांनी २४ सप्टेंबरला बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून, मुख्याध्यापकांविरुद्ध बीएनएस कलम २२३ अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्षांच्या आदेशानुसार अतिवृष्टीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, सुयश विद्यालयात शाळा चालू ठेवल्याची बाब उघड झाली. नाटके यांच्या फिर्यादीनुसार, दुपारी ४.३० वाजता तहसीलदार यांच्याकडून शाळा सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी विस्तार अधिकारी भारत बावकर यांसह तात्काळ पाहणी केली.

शाळेत पोहोचताच दुपारी ४.४५ च्या सुमारास विद्यार्थी भरलेली स्कूल बस बाहेर पडत असल्याचे निदर्शनास आले. आतमध्ये वर्ग रिकामे असून, शिक्षक व कर्मचारी घरी जाण्याच्या तयारीत होते. या घटनेची माहिती तहसीलदारांना दिल्यानंतर पोलीसांकडे तक्रार दाखल करण्यात आली.

या उल्लंघनामुळे बार्शी तालुक्यात शिक्षण क्षेत्रात संतापाची लाट उसळली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळा प्रशासनाची जबाबदारी गंभीरपणे घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिस तपास सुरू असून, मुख्याध्यापकांवर कठोर कारवाईची शक्यता आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

सोलापुरात लाचखोर तलाठ्याला रंगेहाथ पकडले; सहायक महसूल अधिकाऱ्यावरही गुन्हा दाखल