**बार्शी पोलिसांची दमदार कारवाई: ३ लाख ३५ हजारांच्या सोने चोरीतील आरोपी ३ तासांत गजाआड**
**बार्शी पोलिसांची दमदार कारवाई: ३ लाख ३५ हजारांच्या सोने चोरीतील आरोपी ३ तासांत गजाआड**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी २९ सप्टेंबर २०२५: बार्शी शहर पोलिसांनी तंत्रज्ञान आणि तत्परतेच्या जोरावर एका चोरी प्रकरणाचा अवघ्या तीन तासांत उकल केली. २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६:१५ वाजता भगवंत मंदिरात असलेल्या फिर्यादी विलास दत्तात्रय सुरवसे यांच्या उघड्या घरात प्रवेश करून अज्ञात चोरट्याने तिजोरी फोडली आणि ३ लाख ३५ हजार रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली. बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. ७८६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ अंतर्गत नोंद झाली.
पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या नेतृत्वात गुन्हे प्रकटीकरण पथकाने तातडीने सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. यातून मिळालेल्या क्लूजवरून आरोपी नागेश राजू बगाडे (वय ३२, रा. झाडबुके मैदानामागे, पाण्याच्या टाकीजवळ, बार्शी) याला रिंग रोडवरून चोरीच्या पूर्ण मालासह ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर अधीक्षक यावलकर आणि उपविभागीय अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनात झाली.
पथकातील सदस्य: उमाकांत कुंजीर, अजित वरपे, माने , डबडे , साठे , फत्तेपुरे , जाधव , पवार , उदार , देशमुख , नितनात , बहिरे , शेख , उघडे आणि भोगे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
पोलिस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले, "आधुनिक तंत्र आणि पथकाच्या समर्पणामुळे गुन्हेगारांना त्वरित पकडता आले. यामुळे शहरात सुरक्षिततेची भावना वाढेल." पोलिसांनी नागरिकांना घर सुरक्षित ठेवण्याचे आणि संशयास्पद हालचालींवर नजर ठेवण्याचे आवाहन केले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या