**हॉटेलजवळ चरी खोदताना वाद; चुलत भावांनी कोयता व लोखंडी गजाने हल्ला**
**हॉटेलजवळ चरी खोदताना वाद; चुलत भावांनी कोयता व लोखंडी गजाने हल्ला**
**KDM NEWS प्रतिनिधी**बार्शी प्रतिनिधी** शेलगाव (ता. बार्शी) : हॉटेलजवळील रस्त्यावर पाणी साचल्याने चरी खोदण्याच्या कामातून भडकलेल्या वादात चुलत भावांनी कोयता व लोखंडी गजाने हल्ला चढवला. या मारामारीत हॉटेल व्यावसायिक उमेश ईश्वर शिंदे (३८) गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर बार्शीतील सुविधा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत, तर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उमेश शिंदे यांच्या भावाच्या नावाने चालणारे 'गोल्डन बार व परमिट रूम' हे हॉटेल कुटुंबाच्या उपजीविकेचा आधार आहे. याच हॉटेलच्या शेजारी चुलत भाऊ दशरथ महिपती शिंदे यांचे 'शिंदेशाही' हॉटेल आहे. शनिवारी दुपारी साडेएक वाजता हॉटेलसमोर रस्त्यावर पाण्याची साचलेली पाणी वाहून नेण्यासाठी जेसीबी मशीनने चरी खोदण्यास सुरुवात झाली. तेव्हा दशरथ शिंदे यांनी आक्रमकपणे वाद घातला.
वाद तापला आणि चुलत भाऊ ओंकार दशरथ शिंदे याने हातात कोयता घेऊन उमेश यांच्या डाव्या हातावर वार केला. त्याचवेळी वैभव दशरथ शिंदे याने लोखंडी गजाने उजव्या हातावर प्रहार केले. भांडण ऐकून उमेश यांचा भाऊ गणेश शिंदे घटनास्थळी धावला आणि मध्यस्थीचा प्रयत्न केला. मात्र, ओंकारने त्यालाही हाताने मारहाण केली. निघताना आरोपींनी "याला जिवंत ठेवायचं नाही" अशी धमकी दिली, असं जखमींनी सांगितलं.
घटना घडल्यानंतर उमेश यांना तात्काळ बार्शीतील सुविधा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यांच्या दोन्ही हातांवर १० ते १२ टाके घातले असून, त्यांची स्थिती चिंताजनक आहे. उमेश शिंदे यांनी शेलगाव पोलिस ठाण्यात चुलत भाव ओंकार दशरथ शिंदे, वैभव दशरथ शिंदे व दशरथ महिपती शिंदे (सर्व रा. शेलगाव, ता. बार्शी) यांच्याविरुद्ध कोयता व शस्त्राने हल्ला, गुन्हेगारी धमकी व मारहाणीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तिघांना अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरू केली असून, स्थानिक व्यापारी व कुटुंबातील शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याचं सांगितलं.
या घटनेमुळे शेलगाव परिसरात भीतीचे वातावरण आहे. हॉटेल व्यावसायिकांमधील जागा व व्यापार वाद वाढत असल्याने पोलिस प्रशासनाने निरीक्षण वाढवावं, असा आग्रह स्थानिकांनी केला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या