पोस्ट्स

प्रामाणिकपणे काम करणारांची सेवानिवृत्ती नसते तर ती सेवापूर्ती असते

आ.श्री राजेंद्र राऊत न.पा.प्राथ. शि. मंडळ,बार्शीचे पर्यवेक्षक मा.श्री.संजय पाटील साहेब यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा बार्शी येथील समृध्दी मंगल कार्यालयात संपन्न झाला.आपल्या कामावर अपार निष्ठा व प्रेम असणारे,गोरगरीब विद्यार्थी व सर्वसामान्य माणूस यांच्या प्रतीसामाजिक बांधिलकी ठेवून सर्व शिक्षकांना समजावून तर कधी अधिकारवाणीने सांगून १००% प्रशासकीय कामकाज करून घेणारे,निस्वार्थपणे सेवा बजावणारे बार्शी न.पा. शि.मंडळ बार्शी चे पर्यवेक्षक मा.संजय पाटील साहेब यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा दि.२२ रोजी संपन्न झाला              कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.मा.आमदार श्री. राजेंद्र राऊत यांचे शुभहस्ते बार्शी तालुक्याच्या वतीने व कार्यालय प्रमुख म्हणून प्रशासन अधिकारी श्री.अनिल बनसोडे साहेबांच्या हस्ते संजय पाटील साहेबांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.सावित्रीबाई फुले खाजगी प्राथ.शिक्षक पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री.युवराज जगताप व सचिव श्री.बाळासाहेब आवारे आणि पदाधिकारी यांच्या वतीनेही सन्मान करण्यात आला अध्यक्षीय मनोगतात मा.आमदार राजाभाऊ राऊत य...