**जिल्ह्यात अनैतिक व्यापाराचे जाळे; करमाळा, मोहोळनंतर बार्शीतही कारवाईची मागणी**
**जिल्ह्यात अनैतिक व्यापाराचे जाळे; करमाळा, मोहोळनंतर बार्शीतही कारवाईची मागणी** **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**सोलापूर, 22 जून 2025: सोलापूर जिल्ह्यात अनैतिक व्यापाराच्या घटनांनी डोके वर काढले आहे. करमाळा तालुक्यातील कमलाभवानी लॉज आणि मोहोळ तालुक्यातील आर्यन लॉज येथे पोलिसांनी 19 आणि 20 जून 2025 रोजी छापे टाकून वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला. या कारवायांमुळे बार्शी तालुक्यातही अशा गैरप्रकारांचा सुळसुळाट असल्याची शक्यता बळावली आहे. स्थानिक नागरिकांनी बार्शीतील लॉज आणि ढाब्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. **करमाळा प्रकरण: लॉज मालक अटकेत** करमाळ्यातील भवानी पेठेतील कमलाभवानी लॉजवर 20 जून रोजी पोलीस निरीक्षक रणजीत माने यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला. बनावट ग्राहक संदीपान जयराम पागीरे (वय 40, रा. मतेवाडी, जामखेड) याला पाठवून सायंकाळी 7 वाजता कारवाई झाली. लॉज मालक प्रथमेश सुनिल राठोड (वय 22, रा. भवानी पेठ) याने 1,000 रुपये घेऊन एका महिलेला वेश्याव्यवसायासाठी पुरवल्याचे उघड झाले. दुसऱ्या खोलीत दोन महिलांना बंदिस्त अवस्थेत आढळले. पोलिसांनी 1,000 रुपये रोख आणि दोन कंड...