पोस्ट्स

जून, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

सोलापूर : मराठा समाजातील तरुणाईची कोंडी; कुणबी दाखल्याची व्हॅलिडिटी होईना, EWSचाही मार्ग बंद

इमेज
पुन्हा सत्ता मिळावी या कारणासाठी केलेली नोकर भरती, महाविद्यालयीन प्रवेशांसाठी सुरू असलेली प्रक्रिया यामध्ये मराठा समाजातील युवक व युवती करिअरची संधी शोधत आहे. करिअर असताना दिसत आहे,पण सरकारने दिलेले १० टक्क्यांचे आरक्षणही सोबत आहे.मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनामुळे शोधलेल्या कुणबी नोंदीही साथ आहे. एवढे सगळे सोबतीला असतानाही मराठा समाजातील युवक व युवतींची महाकोंडी होऊ केली जात आहे. जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या मनमानी कारभारामुळे मराठा समाजातील तरुणाईला भुर्दंड व प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत कुणबीच्या ६६ हजार ८४५ नोंदी सापडल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने आतापर्यंत १९ हजार ९०४ जणांना कुणबीचे जात प्रमाणपत्र दिले आहे. जात प्रमाणपत्र मिळविण्यासाठी झालेल्या मनस्तापापेक्षाही जास्तीचा मनस्ताप व आर्थिक भुर्दंड जात प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी होताना दिसत आहे.  प्रमाणपत्राची वैधताच नसल्याने प्रवेशासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने राज्यातील मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासव...

१५०० रु लाच स्वीकारताना बार्शी पुरवठा विभागाची महिला अँटीकरप्शनच्या जाळ्यात

बार्शी तहसील पुरवठा विभागाकडून धान्य मिळण्यासाठी १५०० रू.लाच स्वीकारताना आरोपी महिला एसीबी च्या जाळ्यात...             बार्शी :प्रतिनिधी; तक्रारदार यांना बरेच दिवसापासून धान्य मिळत नसल्याने अनेक वेळा रेशन दुकानदार व पुरवठा अधिकारी यांच्याकडे चकरा मारत होते. यांचे पिवळ्या रेशन कार्ड वर धान्य मिळत नसल्याने तक्रारदार यांनी बार्शी तहसील कार्यालय पुरवठा शाखा येथील डाटा एन्ट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांना भेटून लेखी अर्ज दि 14.06.2024 रोजी केला होता. सदर वेळी डाटा ऑपरेटर वर्षा काळे यांनी अर्ज न स्वीकारता तक्रारदार यांना 1500/- रुपये लाचेची मागणी करून अर्ज व 1500/- रुपये घेऊन दिनांक 18.06.2024 रोजी बोलावले होते.  त्यावरून दिनांक 18.06.2024 रोजी डाटा ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांनी पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदार यांच्याकडे पिवळ्या रेशन कार्ड धान्य सुरू करण्यासाठी 1500/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची 1500/- रुपये डाटा ऑपरेटर श्रीमती वर्षा भगवान काळे यांनी स्वतः स्वीकारले असता त्यांना रंगेहात लाच लुचपत विभागाकडून पकडण्यात आले आहे. त्यावरून बार्शी शह...