१५०० रु लाच स्वीकारताना बार्शी पुरवठा विभागाची महिला अँटीकरप्शनच्या जाळ्यात

बार्शी तहसील पुरवठा विभागाकडून धान्य मिळण्यासाठी १५०० रू.लाच स्वीकारताना आरोपी महिला एसीबी च्या जाळ्यात...
            बार्शी :प्रतिनिधी; तक्रारदार यांना बरेच दिवसापासून धान्य मिळत नसल्याने अनेक वेळा रेशन दुकानदार व पुरवठा अधिकारी यांच्याकडे चकरा मारत होते. यांचे पिवळ्या रेशन कार्ड वर धान्य मिळत नसल्याने तक्रारदार यांनी बार्शी तहसील कार्यालय पुरवठा शाखा येथील डाटा एन्ट्री ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांना भेटून लेखी अर्ज दि 14.06.2024 रोजी केला होता. सदर वेळी डाटा ऑपरेटर वर्षा काळे यांनी अर्ज न स्वीकारता तक्रारदार यांना 1500/- रुपये लाचेची मागणी करून अर्ज व 1500/- रुपये घेऊन दिनांक 18.06.2024 रोजी बोलावले होते. 
त्यावरून दिनांक 18.06.2024 रोजी डाटा ऑपरेटर श्रीमती वर्षा काळे यांनी पडताळणी कारवाईमध्ये तक्रारदार यांच्याकडे पिवळ्या रेशन कार्ड धान्य सुरू करण्यासाठी 1500/- रुपये लाचेची मागणी करून सदर लाचेची 1500/- रुपये डाटा ऑपरेटर श्रीमती वर्षा भगवान काळे यांनी स्वतः स्वीकारले असता त्यांना रंगेहात लाच लुचपत विभागाकडून पकडण्यात आले आहे. त्यावरून बार्शी शहर पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे .या कामी श्री. गणेश कुंभार, पोलीस उपाधीक्षक, लाप्रवि, सोलापूर
पोलीस अंमलदार :- पो.हवा./शिरीषकुमार सोनवणे, पोना/ संतोष नरोटे पोशी / रवी हटकिळे, चापोशि/ श्याम सुरवसे सर्व नेम ला.प्र.वि., सोलापूर. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी/कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
    (गणेश कुंभार)
सहाय्यक पोलीस आयुक्त/पोलीस उप अधीक्षक,लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर.
मो.क्र. 9764153999
कार्यालय क्र 0217-2312668
ईमेल dyspacbsolapur@gmail.com
Toll free no 1064

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल