पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

पत्रकारांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे आहे - संदीप काळे

इमेज
व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला. बार्शी, जि. सोलापूर : बदलत्या काळात डिजिटल मीडिया एक प्रभावी माध्यम बनले आहे. या माध्यमाला मुख्य प्रवाहातील पत्रकारितेचा भाग बनवण्यासाठी आमची संघटना कार्यरत आहे. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. व्हॉईस ऑफ मीडियाची पंचसूत्री जगभरातील 200 देशांमध्ये पोहचवायची आहे, असे वक्तव्य संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले. व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन बार्शी, जिल्हा सोलापूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक संदीप काळे, राज्य उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ, शिक्षणतज्ञ अनिल बनसोडे, साहित्यिक रामचंद्र इकारे, कर सल्लागार सुरेश शेळके, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे, वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, व्हॉईस ऑफ मीडियाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष हुंकार बनसोडे, नाशिक जिल्हा अध्यक्ष कुमार कडलग, प्रविण परदेशी, अविनाश बोकेफोडे आदी उपस्थित होते. शिक्षणतज्ञ अनिल...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक : महाराष्ट्रातील नवनिर्वाचित आमदारांची यादी, तुमचाही आमदार यामध्ये आहेत का?

इमेज
महाराष्ट्र मध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरताना दिसत आहे. भाजपला सर्वाधिक 130 जागांवर विजय मिळताना दिसतोय. त्यापाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 54 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 40 जागांवर यश मिळताना दिसत आहे. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत अक्षरश: दारुण पराभव होताना दिसतोय. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सर्वाधिक 21 जागांवर यश मिळालं आहे. त्यापाठोपाठ काँग्रेसला 18 आणि शरद पवार गटाला 12 जागांवर यश मिळताना दिसत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी भुईसपाट झालेली बघायला मिळत आहे.महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा आजचा निकाल अत्यंत महत्त्वाचा ठरला आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असून, त्यांना 220 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळाल्याचे दिसत आहे. त्याच वेळी, महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे आणि त्यांना 50 जागांपर्यंतच मर्यादा राहिल्या आहेत. विशेष म्हणजे महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांना विरोधी पक्षनेता पदासाठी आवश्यक 29 जागा देखील मिळाल्या नाहीत, ज्यामुळे एकही पक्ष विरोधी पक्षनेता होऊ शकलेला नाही. महायुतीच्या विजयाची मुख्य कारणे म्हणजे...

प्रामाणिकपणे काम करणारांची सेवानिवृत्ती नसते तर ती सेवापूर्ती असते

इमेज
आ.श्री राजेंद्र राऊत न.पा.प्राथ. शि. मंडळ,बार्शीचे पर्यवेक्षक मा.श्री.संजय पाटील साहेब यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा बार्शी येथील समृध्दी मंगल कार्यालयात संपन्न झाला.आपल्या कामावर अपार निष्ठा व प्रेम असणारे,गोरगरीब विद्यार्थी व सर्वसामान्य माणूस यांच्या प्रतीसामाजिक बांधिलकी ठेवून सर्व शिक्षकांना समजावून तर कधी अधिकारवाणीने सांगून १००% प्रशासकीय कामकाज करून घेणारे,निस्वार्थपणे सेवा बजावणारे बार्शी न.पा. शि.मंडळ बार्शी चे पर्यवेक्षक मा.संजय पाटील साहेब यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा दि.२२ रोजी संपन्न झाला              कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.मा.आमदार श्री. राजेंद्र राऊत यांचे शुभहस्ते बार्शी तालुक्याच्या वतीने व कार्यालय प्रमुख म्हणून प्रशासन अधिकारी श्री.अनिल बनसोडे साहेबांच्या हस्ते संजय पाटील साहेबांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.सावित्रीबाई फुले खाजगी प्राथ.शिक्षक पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री.युवराज जगताप व सचिव श्री.बाळासाहेब आवारे आणि पदाधिकारी यांच्या वतीनेही सन्मान करण्यात आला अध्यक्षीय मनोगतात मा.आमदार राजाभाऊ राऊत य...