प्रामाणिकपणे काम करणारांची सेवानिवृत्ती नसते तर ती सेवापूर्ती असते

आ.श्री राजेंद्र राऊत न.पा.प्राथ. शि. मंडळ,बार्शीचे पर्यवेक्षक मा.श्री.संजय पाटील साहेब यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा बार्शी येथील समृध्दी मंगल कार्यालयात संपन्न झाला.आपल्या कामावर अपार निष्ठा व प्रेम असणारे,गोरगरीब
विद्यार्थी व सर्वसामान्य माणूस यांच्या प्रतीसामाजिक बांधिलकी ठेवून सर्व शिक्षकांना समजावून तर कधी अधिकारवाणीने सांगून १००% प्रशासकीय कामकाज करून घेणारे,निस्वार्थपणे सेवा बजावणारे बार्शी न.पा. शि.मंडळ बार्शी चे पर्यवेक्षक मा.संजय पाटील साहेब यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळा दि.२२ रोजी संपन्न झाला
             कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन करून करण्यात आली.मा.आमदार श्री. राजेंद्र राऊत यांचे शुभहस्ते बार्शी तालुक्याच्या वतीने व कार्यालय प्रमुख म्हणून प्रशासन अधिकारी श्री.अनिल बनसोडे साहेबांच्या हस्ते संजय पाटील साहेबांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.सावित्रीबाई फुले खाजगी प्राथ.शिक्षक पतसंस्थेच्या वतीने अध्यक्ष श्री.युवराज जगताप व सचिव श्री.बाळासाहेब आवारे आणि पदाधिकारी यांच्या वतीनेही सन्मान करण्यात आला अध्यक्षीय मनोगतात मा.आमदार राजाभाऊ राऊत यांनी गेली वीस वर्षापासून शिक्षण मंडळ व माझा अत्यंत जवळचा संबंध आल्याने पाटील साहेब यांची स्वतःला झोकून देऊन कशाचीही पर्वा न करता काम करण्याची पद्धती मला ज्ञात आहे त्यांनी शिक्षण मंडळामध्ये अतिशय तळमळीने व प्रामाणिकपणे विद्यार्थी हितासाठी काम केले असून प्रामाणिकपणे काम करणारांची सेवानिवृत्ती नसते तर ती सेवापूर्ती असते आवश्यकता भासेल तेव्हा त्यांनी शिक्षण मंडळास सहकार्य करावे अशा शब्दात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामांचा गौरव पूर्ण उल्लेख करून तालुक्याच्या वतीने सेवानिवृत्ती निमित्त हार्दिक शुभेच्छा दिल्या 

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून बार्शी तालुक्याचे मा.आमदार राजाभाऊ राऊत तर प्रमुख पाहुणे म्हणून .श्री.अरुणभाऊ कापसे( मा. चेअरमन म. रा. कंझुमर फेडरेशन मुंबई व मा .संचालक जिल्हा मध्यवर्ती सह बँक,सोलापूर),श्री.संतोष पाटील (सहसचिव सहकार विभाग मंत्रालय मुंबई),मा.श्री.आसिफ भाई तांबोळी ( मा.नगराध्यक्ष बार्शी),मा. श्री. रमेश आण्णा पाटील( मा.नगराध्यक्ष बार्शी),मा .श्री.रावसाहेब मनगिरे ( मा . नगरसेवक व सदस्य कृषी उत्पन्न बाजार समिती),श्री.अनिल बनसोडे (प्रशासन अधिकारी न.पा.शिक्षण मंडळ, बार्शी) तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ. श्री.भरत गायकवाड( मा.वैद्यकीय अधिकारी, बार्शी),डॉ.श्री.चंद्रकांत मोरे(बालरोगतज्ज्ञ बार्शी)मा.श्री सुनिल देशमुख (मा.पोलीस उपायुक्त,पुणे ) मा.श्री राजाभाऊ देशमुख अध्यक्ष द्राक्ष बागायतदार ,मा.श्री दाजीसाहेब देशमुख ),मा.श्री.राजू घोलप (मा.नगरसेवक), मा.श्री भारत पवार सर (मा. उपसभापती शिक्षण मंडळ ) श्री . अशोक बारबोले (मा.सदस्य शिक्षण मंडळ )श्री.सुनिल खाडे (मंत्रालय मुंबई ) श्री सुरेश शिंदे (प्रभारी पर्यवेक्षक) व इतर मान्यवर उपस्थित होते.
 अनेक मान्यवर ,नातेवाईक, शिक्षक बंधू भगिनी,मित्र परिवाराने त्यांचा सन्मान केला
प्रसंगी श्री.प्रकाश पाटील सर,श्री.भिमराव नांदवटे सर,श्री प्रताप दराडे सरअशा अनेक मान्यवरांनी संजय पाटील यांनी आपल्या कारकिर्दीत केलेल्या उल्लेखनीय कामांचा लेखाजोखा मांडत त्यांच्या कार्याचा विशेष उल्लेख करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देत आपली मनोगते व्यक्त केली.संजय पाटील यांनी शिवाजी महाविद्यालयात १९८६ ला लायब्ररी अटेंडन्ट म्हणून सेवेस सुरुवात केली १९८७ते २००७ नगर पालिका शिक्षण मंडळात उपशिक्षक म्हणून तर २००७ ते २०२४ पर्यवेक्षक म्हणून न.पा. शिक्षण मंडळ बार्शी व याच कालावधीत काही काळ प्रभारी प्रशासन अधिकारी म्हणून ही सुमारे ६ महिने कार्य केले व नियत वयोमानानुसार ते ३१/०५/२०२४ रोजी ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर कार्यमुक्त झाले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अभिमन्यू सातपुते सर व श्री ज्ञानेश्वर खुने सर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री बाबासाहेब शिंदे यांनी केले तर आभार श्री सातपुते यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी ॲड.श्री. राहूल झालटे,श्री.संतोष सुर्यवंशी,श्री.अशोक कांबळे,श्री बलभीम माळी,श्री.सचिन उनवणे, श्री विनायक पैकेकरी,श्री.निखिल पायघन व संजय पाटील मित्रमंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले .सदर कार्यक्रमास शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,मित्रपरिवार,स्नेही बहुसंख्येने उपस्थित होत

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल