पत्रकारांच्या कुटुंबाचे आशीर्वाद घेण्यासाठी काम करायचे आहे - संदीप काळे

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडला.

बार्शी, जि. सोलापूर : बदलत्या काळात डिजिटल मीडिया एक प्रभावी माध्यम बनले आहे. या माध्यमाला मुख्य प्रवाहातील पत्रकारितेचा भाग बनवण्यासाठी आमची संघटना कार्यरत आहे. पत्रकार व त्यांच्या कुटुंबीयांचे आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही काम करत आहोत. व्हॉईस ऑफ मीडियाची पंचसूत्री जगभरातील 200 देशांमध्ये पोहचवायची आहे, असे वक्तव्य संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.

व्हॉईस ऑफ मीडिया डिजिटल विंगच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या पदग्रहण सोहळ्याचे आयोजन बार्शी, जिल्हा सोलापूर येथे करण्यात आले. या कार्यक्रमात संघटनेचे संस्थापक संदीप काळे, राज्य उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ, शिक्षणतज्ञ अनिल बनसोडे, साहित्यिक रामचंद्र इकारे, कर सल्लागार सुरेश शेळके, श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार जयकुमार शितोळे, वृक्षसंवर्धन समितीचे अध्यक्ष उमेश काळे, व्हॉईस ऑफ मीडियाचे धाराशिव जिल्हा अध्यक्ष हुंकार बनसोडे, नाशिक जिल्हा अध्यक्ष कुमार कडलग, प्रविण परदेशी, अविनाश बोकेफोडे आदी उपस्थित होते.

शिक्षणतज्ञ अनिल बनसोडे यांनी पत्रकाराच्या सामाजिक कल्याणासाठी आवाज उठवणाऱ्या कामाचे कौतुक केले, तर साहित्यिक रामचंद्र इकारे यांनी संघटनेच्या नेतृत्व क्षमतेवर भर दिला.

व्हॉईस ऑफ मीडियाचे कार्यकारी राज्य सचिव गणेश शिंदे यांनी संघटनेच्या उद्दिष्टांचा परिचय करुन दिला, तर प्रदेश उपाध्यक्ष अजित कुंकुलोळ यांनी महाराष्ट्रातील डिजिटल मीडिया पत्रकारांना संघटनेचे सदस्य होण्याचे आवाहन केले.

नवीन प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांनी डिजिटल मीडिया पत्रकारांना अधिकृत मान्यता मिळवण्यासाठी संघटना काम करणार असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपर्णा दळवी यांनी केले, तर कर्मवीर ढोल-ताशा ध्वज पथक व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल