*नागपूर पोलिसांचा हायटेक पॅटर्न! आता तक्रार नोंदवण्यासाठी लागणार फक्त ३ मिनिटे; AI आणि व्हॉइस टायपिंगचा असा होतोय वापर*

*नागपूर पोलिसांचा हायटेक पॅटर्न! आता तक्रार नोंदवण्यासाठी लागणार फक्त ३ मिनिटे; AI आणि व्हॉइस टायपिंगचा असा होतोय वापर* 

*KDM NEWS प्रतिनिधी नागपूर : पूर्वी पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवण्यासाठी १५ ते २५ मिनिटे लागत असत. आता मात्र अवघ्या ३ मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होत आहे. नंदनवन पोलीस ठाण्याने सुरू केलेल्या नव्या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), व्हॉइस टायपिंग आणि व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून तक्रार नोंदणी सुलभ केली आहे. या प्रयोगामुळे पोलिसांचा वेळ वाचतो, मानवी चुका कमी होतात आणि तक्रारदारांना तात्काळ प्रत मिळते.

नंदनवन ठाणेदार कैलास देशमाने यांच्या पुढाकाराने ही प्रणाली विकसित करण्यात आली. तक्रारदार व्हॉट्सअ‍ॅपवर व्हॉइस टायपिंग करतो. ही टंकलेखन केल्यानंतर AI च्या मदतीने तांत्रिक दुरुस्ती होते. नंतर ही तक्रार पोलिसांच्या व्हॉट्सअ‍ॅप गटातील CCTNS टीमला पाठवली जाते. ठाण्यातील अंमलदार फक्त कॉपी-पेस्ट करून तक्रार नोंद घेतात. त्याच वेळी ती पोलीस डायरी आणि CCTNS प्रणालीवरही अपडेट होते. पूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ होती – डायरी नोंद, CCTNS टंकलिखित नोंद आणि प्रत देणे यासाठी बराच वेळ जायचा.

या प्रणालीचा फायदा मुख्यतः अदखलपात्र गुन्ह्यांसाठी (मोबाईल चोरी, मौल्यवान वस्तू हरवणे इ.) आहे. पूर्वी चोरीच्या तक्रारीसाठी १५-२० मिनिटे आणि हरवलेल्या वस्तूंसाठी २०-२५ मिनिटे लागत. आता ३-४ मिनिटांत पूर्ण. नंदनवन ठाण्याच्या पुढाकाराने सर्व २०० महिला अंमलदारांना याचे प्रशिक्षण देण्यात आले. बसल्या ठिकाणी २-३ मिनिटांत नोंद घेणे शक्य झाले.

सध्या हा प्रयोग नंदनवन, अजनी, इमामवाडा, सक्करदरा, हुडकेश्वर आणि बेलतरोडी या सहा ठाण्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे. पोलिस उपआयुक्त रश्मिता राव यांनी सांगितले, “या प्रणालीमुळे पोलिसांच्या कामाचा ताण कमी होतो. टंकलेखनातील मानवी चुका टाळता येतात. स्मार्टफोनमधील उपलब्ध AI साधनांचा वापर करून कुठलाही अतिरिक्त खर्च न करता ही प्रक्रिया सुरू ठेवता येईल. टप्प्या टप्प्याने शहरातील सर्व ठाण्यांत ही पद्धत लागू करण्याचे नियोजन आहे.”

नागपूर पोलिस दलाने उपलब्ध तंत्रज्ञानाचा चांगला वापर करून नागरिकांसाठी सेवा अधिक सुलभ आणि वेगवान केली आहे. या प्रणालीमुळे पोलिस ठाण्यांतील गर्दी कमी होईल आणि अधिकाऱ्यांना गुन्ह्यांच्या तपासावर जास्त लक्ष केंद्रित करता येईल.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**