**कांदा आंदोलन पेटले; सोलापूर बाजार समितीत लिलाव बंद, दरवाढीनंतर मागे**

*कांदा शेतकऱ्यांचा संताप; सोलापूर बाजार समितीत लिलाव ठप्प, हमीभाव-१००० अनुदानाची मागणी* 

*KDM NEWS सोलापूर (प्रतिनिधी), ३ मार्च* सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याचे दर कोसळल्याने शेतकरी संतप्त झाले. प्रति क्विंटल उत्पादन खर्च २००० रुपयांपेक्षा जास्त असताना सध्याचे सरासरी दर ७०० ते १००० रुपयांपर्यंत घसरले आहेत. लाल कांद्याची आवक ३३ हजार क्विंटलवर पोहोचल्याने भाव आणखी दबावात आले. किमान दर १०० रुपये तर कमाल १८५० रुपये एवढाच राहिला. यामुळे राज्यभर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले आहे.

आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शंकर गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी सोलापूर बाजार समितीवर मोर्चा काढला. लिलाव पूर्णपणे बंद पाडून दिवसभर आंदोलन केले. शरद भालेकर, राम हाके, रामराव काटे, रामहरी तेजगुडे, आबासाहेब नलगे, भीमराव झांबरे, विजयसिंह नाईकनवरे, दत्तात्रय ठोंबरे, आप्पासाहेब मोरे, अंबादास जगताप, बाबासाहेब लोखंडे, अंकुश नलगे, सागर चव्हाण, आप्पासाहेब वीर, नागनाथ मोरे, नितीन शिंदे यांसह विविध जिल्ह्यांतील शेतकरी उपस्थित होते.

शंकर गायकवाड यांनी मागणी केली की, कांद्याला प्रति क्विंटल ३००० रुपये हमीभाव आणि नुकसानभरपाई म्हणून १००० रुपये अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे. राज्यातील सर्व बाजार समित्यांमध्ये कांदा लिलाव बंद करण्याचे आवाहनही त्यांनी केले. दोनशे ते तीनशे रुपयांनी लिलावातील दर वाढवून पुकारल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

बाजार समिती सचिव अतुलसिंह राजपूत यांनी विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. जेलरोड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक संजय अवताडे व शहाजी दुधाळ यांच्या नेतृत्वात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

सोलापूरसह राज्यातील इतर बाजारांमध्येही कांद्याचे दर २०० ते ८०० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. वाहतूक खर्चही निघत नसल्याने अनेक ठिकाणी शेतमाल विकण्यास नकार दिला जात आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**