**बार्शी तालुक्यातील कव्हे गावात ८० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन जीवन संपवले**

**बार्शी तालुक्यातील कव्हे गावात ८० वर्षीय शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन जीवन संपवले** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी, दि. ९ मार्च २०२६* : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कव्हे गावात आज सकाळी सुमारे ६ वाजता ८० वर्षीय ज्येष्ठ शेतकरी विश्वनाथ दत्तू घळके यांनी शेतातील झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर बार्शी तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला आहे. पोस्टमॉर्टम अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

विश्वनाथ दत्तू घळके हे कव्हे गावात कुटुंबासह राहत होते. त्यांची शेती गट क्रमांक ३१८ मध्ये आहे. सकाळी फुले तोडण्यासाठी शेतात गेलेले नातू दयानंद नवनाथ घळके (वय ३६) आणि त्यांचा भाऊ बालाजी हे विहिरीकडे गेले असता झाडावर गळफास घेतलेला विश्वनाथ घळके दिसले. बालाजी यांनी दयानंद यांना हाक मारली. दोघे धावत गेल्यावर विश्वनाथ यांचा मृतदेह दोरीने झाडाला बांधलेल्या अवस्थेत आढळला.

दयानंद घळके हे विश्वनाथ यांचे नातू असून, दोघांच्या शेती शेजारीशेजारी आहेत. दयानंद यांच्या जबाबानुसार, विश्वनाथ यांचा स्वभाव तर्कटी होता, पण कुटुंबात कोणताही मोठा वाद किंवा आर्थिक अडचण नव्हती. घटनेची माहिती मिळाल्यानंतर दयानंद यांनी विश्वनाथ यांच्या मुलांना – नागनाथ आणि सचिन यांना फोन केला आणि नंतर बार्शी तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली.

पोलिस उपनिरीक्षकांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून शवाची तपासणी केली. प्राथमिक तपासात आत्महत्येचाच प्रकार असल्याचे दिसते. कोणतेही संशयास्पद पुरावे आढळले नाहीत. अज्ञात कारणांवरून आत्महत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कव्हे गावात ही घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. विश्वनाथ घळके हे गावातील ज्येष्ठ शेतकरी आणि सर्वांच्याच परिचयाचे व्यक्ती होते. पोलिस तपास सुरू असून, पुढील माहिती लवकरच समोर येईल, अशी अपेक्षा आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**