*बार्शी : अभियांत्रिकी विद्यार्थिनीचे अपहरण, जबरदस्ती विवाह आणि अत्याचार; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल*
*बार्शी : अभियांत्रिकी विद्यार्थिनीचे अपहरण, जबरदस्ती विवाह आणि अत्याचार; नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी: बार्शी तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात एका २१ वर्षीय बीटेक विद्यार्थिनीला फोटो-व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अपहरण करून जबरदस्तीने लग्न लावण्यात आल्याचा आणि नंतर तिच्यावर सातत्याने मारहाण व शारीरिक अत्याचार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपींसह एकूण नऊ जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(२)(एम), ८७, ११५(२), ३५२, ३५१(३) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे.
पीडित तरुणी बार्शी शहर परिसरात राहते आणि BIT महाविद्यालय, बार्शी येथे बीटेकचे शिक्षण घेत आहे. तिची कॉलेजमध्ये सुरज मोरे (रा. गोरमाळे, ता. बार्शी) याच्याशी ओळख झाली होती. याच काळात गणेश टेकाळे (रा. अलिपूर रोड, माऊली चौक, बार्शी) याने तिचे फोटो व व्हिडिओ आपल्याकडे असल्याचे सांगून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
६ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजता बार्शी बायपास रोडवरील विश्वा मंगल कार्यालयाजवळ उभी असलेल्या तरुणीला गणेश टेकाळे याने चारचाकी गाडी (क्रमांक MH १३ CS १२४६) घेऊन धमकी देऊन गाडीत बसवले. तिचा मोबाइल बंद करून तिला बार्शी-येरमाळा मार्गे बीडकडे नेले. तेथे अजय अस्वले (रा. बीड) याला सोबत घेतले.
संध्याकाळी अहिल्यानगर येथे दुसऱ्या गाडीतून सुरज मोरे, प्रदीप काळे व भैय्या (पूर्ण नाव अज्ञात) हे आले. त्यांनीही व्हिडिओ व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी देत तिला दुसऱ्या गाडीत बसवून रात्री मुंबईकडे नेले. मुंबईत सुरज मोरे याने लग्न करण्याचा दबाव टाकला.
दुसऱ्या दिवशी ७ मार्च रोजी सकाळी आरोपींनी तिला आळंदी (पुणे) येथे नेले आणि रिद्धी-सिद्धी मंगल कार्यालयात सुरज मोरे याच्याशी जबरदस्तीने लग्न लावले. या वेळी सुरजचा भाऊ धीरज मोरे व इतर साथीदार उपस्थित होते.
लग्नानंतर आरोपींनी तिला पनवेल येथे एका खोलीत ठेवले. ७ ते ९ मार्च दरम्यान तिच्यावर मारहाण करून तिच्या इच्छेविरुद्ध वारंवार शारीरिक संबंध ठेवण्यात आले. ११ मार्च रोजी तिला बार्शी तालुक्यातील सारोळे येथे सुरज मोरेच्या मावशी (गाटे आडनाव) यांच्याकडे नेले. तेथेही धमक्या दिल्या गेल्या.
अखेर आरोपींनी तिला पांगरी पोलिस स्टेशनला आणले. तेव्हा तिची प्रकृती बिघडल्याने तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले. नंतर बार्शीतील जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये उपचार घेतल्यानंतर तिने कुटुंबीयांना संपूर्ण प्रकार सांगितला आणि पोलिसांत तक्रार दिली.
या फिर्यादीवरून बार्शी तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात गणेश टेकाळे, सुरज मोरे, धीरज मोरे, अजय अस्वले, प्रदीप काळे, भैय्या (अज्ञात), सुरज मोरेची मावशी (गाटे), तिचा मुलगा आणि सुरजची बहीण प्रियंका यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपींच्या शोधासाठी तपास वेगवान केला असून, लवकरच अटक होण्याची शक्यता आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या