*सोलापूर : आखाती युद्धामुळे जिल्ह्यात गॅस टंचाई; अपातकालीन कक्ष स्थापन, तक्रारीसाठी हेल्पलाइन सुरू*
*सोलापूर : आखाती युद्धामुळे जिल्ह्यात गॅस टंचाई; अपातकालीन कक्ष स्थापन, तक्रारीसाठी हेल्पलाइन सुरू*
*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी*सोलापूर, १६ मार्च २०२६ : आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात घरगुती गॅस आणि पेट्रोल-डिझेल वितरणात अडचणी निर्माण झाल्या आहेत. या संकटाचा सामना करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने तातडीने अपातकालीन कक्ष स्थापन केला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी आज याबाबत विशेष आवाहन केले.
सरडे यांनी सांगितले की, “गॅस एजन्सींकडून वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शासनाने कडक उपाययोजना राबवून गॅस वितरण सुरळीत केले आहे. मात्र, या उपायोजनेची अंमलबजावणी योग्य होण्यासाठी अपातकालीन कक्ष कार्यरत करण्यात आला आहे. नागरिकांनी अतिरीक्त साठवणूक करू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनास सहकार्य करावे.”
अपातकालीन कक्ष संपर्क :
जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथील अपातकालीन कक्षाशी ०२१७-२७३१०१२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तक्रारी तात्काळ नोंदवल्या जातील आणि निवारण करण्यात येईल.
ग्रामीण भागातील तक्रारींसाठी तालुकानिहाय पुरवठा अधिकारी/कर्मचारी :
- मोहोळ : श्रीमती सोनाली निटुरे (९०२२००८६८१), श्री. प्रितम पवार (९९७०८२७५७४)
- करमाळा : श्री. महेश घोडके (९४२००८९४६४), श्री. जी.जी. कुंचलवाड (९०२८०६५४१२)
- पंढरपूर : श्रीमती दिव्याश्री वामनराव ढोबळे (८२७५७५३३६१), श्री. विजय बादल (९८८१२३५५९४)
- सांगोला : श्रीमती प्रांजली गावंडे (७२१९६१६६६३), श्रीमती प्रियांका राजेश (७७४३८५७८३८)
- मंगळवेढा : श्रीमती शितल कन्हेरे (८३९०५७२२५७), श्री. जयंत कुलकर्णी (९१७५६२६७४९)
- माळशिरस : श्री. रविकिरण शेटे (८२७५९२६९५५), श्री. एस.डी. केमकर (७०२८१२२२९४)
- बाशी : श्री. निलेश आठवले (७२१८९८१३४४), श्री. संतोष शिंदे (९५१८५६२५३२)
- उत्तर सोलापूर : श्री. निखिल महानूर (९८६०५०८१६१), श्रीमती किरण सुरुशे (७४४८१४५७२९)
- दक्षिण सोलापूर : श्री. नासौरखान पठाण (९८८१५६३६९३), श्रीमती रमा अमोल शिखरे (८४३३६२८६९७)
- अक्कलकोट : श्री. विराज बासेकर (८०५५९०४९१७), श्रीमती पल्लवी शेंडगे (७६६१४५९८६)
शहरी भागातील तक्रारींसाठी परिमंडळ अधिकारी/पुरवठा निरीक्षक :
- श्री. प्रफुल जयश्री संदीप नाईक (८८८८९६९३१७) – परिमंडळ अधिकारी, ड विभाग
- श्री. नंदकिशोर मालू महादेव ढोके (९६६५३९४५९४) – परिमंडळ अधिकारी, अ विभाग
- श्री. राजेश रुक्मिणबाई सुभाष यमपुरे (१९६००१००६०) – प्र. परिमंडळ अधिकारी, ब विभाग
- श्री. सज्जन सिंधु रघुनाथ भोसले (८३२९३६००५१) – पुरवठा निरीक्षक, ड विभाग
- श्री. ज्ञानेश्वर दुष्यांता तानाची काशिद (७७१९८३९०१३) – पुरवठा निरीक्षक, ब विभाग
- श्रीमती डंके गीता गणेश (८३९०००९८५५) – पुरवठा निरीक्षक, अ विभाग
जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी सर्व नागरिकांना विनंती केली आहे की, कोठेही गॅस किंवा पेट्रोल-डिझेलचा तुटवडा भासणार नाही यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे. फक्त तक्रारी योग्य वेळी नोंदवा आणि अफवांपासून दूर राहा.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या