**बार्शी तहसील कार्यालयात १७ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा; आमदार, नगराध्यक्षांसह अधिकारी-नागरिकांना निमंत्रण**
**बार्शी तहसील कार्यालयात १७ मार्चला जागतिक ग्राहक दिन साजरा; आमदार, नगराध्यक्षांसह अधिकारी-नागरिकांना निमंत्रण**
बार्शी, १६ मार्च : शासन आदेशानुसार १५ मार्च हा जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात येत असल्याने बार्शी तहसील कार्यालयात १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ वाजता विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तहसीलदार कार्यालयाच्या पुरवठा विभागाने काढलेल्या पत्रानुसार (क्र. पुरवठा १/कावि/१३७/२०२६, दिनांक १६/०३/२०२६) हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमास मा. दिलीपरावजी सोपल यांच्यासह बार्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा श्रीमती तेजस्विनी कथले, मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे जिल्हा उपाध्यक्ष श्री विजय कुलकर्णी, तालुका अध्यक्ष अमर नाकटिळक, बार असोसिएशनचे अध्यक्ष रणजित गुंड, मार्गदर्शक अॅड. प्रशांत थिटे, सर्व पत्रकार, तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
संदर्भ म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी, सोलापूर यांचे क्र. पुरवठा/कार्या २२(३) प्रशासन / आर आर / १००/२०२६ दिनांक १३/०३/२०२६ चे पत्र आहे.
याशिवाय सर्व गॅस एजन्सी धारक व पेट्रोल पंप धारक यांनी जागतिक ग्राहक दिनाच्या निमित्ताने आयोजित आढावा सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन तहसील कार्यालयाने केले आहे.
कार्यक्रमात ग्राहक हक्क, संरक्षण आणि जागरूकता याविषयी चर्चा होणार असल्याचे सूचित करण्यात आले आहे.
टिप्पण्या