*बार्शी तालुक्यात गॅस सिलेंडर वितरणावर प्रशासनाची कडक नजर; OTP पडताळणी अनिवार्य, काळाबाजार रोखण्यासाठी विशेष दक्षता पथक*

*बार्शी तालुक्यात गॅस सिलेंडर वितरणावर प्रशासनाची कडक नजर; OTP पडताळणी अनिवार्य, काळाबाजार रोखण्यासाठी विशेष दक्षता पथक* 

*KDM NEWS प्रतिनिधी बार्शी  :  
बार्शी तालुक्यात घरगुती एलपीजी सिलेंडरचा पुरवठा पूर्णपणे पारदर्शक ठेवण्यासाठी तहसील प्रशासनाने तातडीने कडक उपाययोजना सुरू केल्या आहेत. गॅस एजन्सींना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, ग्राहकांच्या मोबाईलवर कंपनीकडून येणाऱ्या OTP ची पडताळणी झाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत सिलेंडर वितरित करू नये. यामुळे व्यावसायिक वापर, साठेबाजी किंवा काळाबाजार रोखण्यास मदत होणार आहे.

तालुक्यात इंडियन गॅस, भारत गॅस आणि एचपी गॅस या तीन कंपन्यांच्या एकूण आठ अधिकृत एजन्सी कार्यरत आहेत. या सर्व एजन्सींवर वितरण प्रक्रियेचे कडक नियंत्रण ठेवण्यासाठी तालुका स्तरावर विशेष दक्षता पथक गठीत करण्यात आले आहे. पथक नियमितपणे एजन्सींच्या दैनंदिन सिलेंडर आवक-जावक, उपलब्ध साठा आणि ग्राहकांना दिलेल्या सिलेंडरच्या नोंदी तपासणार आहे. कोणत्याही नियमभंग आढळल्यास संबंधित एजन्सी आणि व्यक्तींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे.

प्रशासनाने तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा पूर्ण पुरवठा सुरळीत असल्याचे जाहीर केले आहे. सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांमुळे नागरिकांनी अनावश्यक साठवणूक करू नये, यासाठी विशेष आवाहन करण्यात आले आहे. तहसीलदार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगितले की, “नागरिकांनी सिलेंडर स्वीकारताना OTP पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करावी, फक्त अधिकृत एजन्सीकडूनच सिलेंडर घ्यावे आणि कोणतीही अनियमितता दिसल्यास तत्काळ प्रशासनाला माहिती द्यावी.”

या उपाययोजनांमुळे तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना योग्य दरात आणि वेळेवर सिलेंडर मिळण्यास मदत होईल तसेच काळाबाजार करणाऱ्यांना आळा बसणार आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**