**गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांची धडक; ६० किलो गायीचे मांस आणि ७ जनावरे जप्त**

**गोवंश कत्तलखान्यावर पोलिसांची धडक; ६० किलो गायीचे मांस आणि ७ जनावरे जप्त** 

**KDM NEWS प्रतिनिधी कुर्डूवाडी ** कुर्डूवाडी (सोलापूर) :** ५ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ५.३० वाजता कुर्डूवाडी पोलिस ठाण्याच्या पथकाने कुरेशी गल्लीतील एका खुल्या पत्राशेडमध्ये बेकायदेशीर गोवंश कत्तल आणि मांस विक्रीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला. ६० किलो गायीचे मांस आणि एकूण सात जर्सी गोवंश जनावरे (५ वासरे, एक गाय व एक खोंड) जप्त करण्यात आली. दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस कॉन्स्टेबल महादेव सुखदेव सोलंकर (पो.क्र. २२२५) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोपनीय माहितीवरून कुर्डूवाडी पोलिस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सरकारी वाहन क्र. एमएच १३/डीएम ९४७९ ने कुरेशी गल्लीत छापा टाकला. पत्राशेडमध्ये मांसाचे तुकडे, पाय आणि मुंडके विक्रीसाठी ठेवलेले आढळले. विक्रेता इस्माइल अबुतालीब कुरेशी (वय २९, रा. कुरेशी गल्ली, कुर्डूवाडी) याने मांस जर्सी गायीचे असल्याचे सांगितले.

शेडच्या लगतच जर्सी गाईची काळ्या-पांढऱ्या रंगाची पाच लहान वासरे, एक तांबड्या-पांढऱ्या रंगाची जर्सी गाय आणि एक पांढरा खोंड अशी एकूण सात जनावरे बांधलेली होती. या जनावरांना अन्न, पाणी, निवारा किंवा चारा यांची कोणतीही व्यवस्था न करता केवळ कत्तलीसाठी उपासमार करून ठेवण्यात आल्याचे पोलिसांना आढळले. या जनावरांचे मालकी हक्क आसिफ मौला कुरेशी (वय ३५, रा. कुरेशी गल्ली, कुर्डूवाडी) यांच्याकडे असल्याचे समजले.

मांसाची खात्री करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. विवेकानंद शिंदे यांना बोलावण्यात आले. त्यांनी २५० ग्रॅम मांसाचे सॅम्पल घेतले. जप्त मालाची किंमत खालीलप्रमाणे आहे:

- ६० किलो गोवंश जातीचे मांस – किंमत १२,००० रुपये (इस्माइल अबुतालीब कुरेशी यांच्या दुकानातून)
- सात जर्सी गोवंश जनावरे – एकूण किंमत ४२,००० रुपये

इस्माइल अबुतालीब कुरेशी यांच्याकडे विनापरवाना गायीचे मांस विक्रीसाठी ठेवले होते, तर आसिफ मौला कुरेशी यांनी जनावरांना निर्दयीपणे कत्तलीसाठी बांधून ठेवल्याचा आरोप आहे. दोघांवरही महाराष्ट्र पशुहिंसा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलिस शिपाई विजय भारत घोगरे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून, जनावरे आणि मांस न्यायालयीन ताब्यात ठेवण्यात आले आहे. या प्रकरणात पुढील तपास सुरू आहे.


KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल