**माढ्यात सख्या चुलत्याने पुतण्यावर केला काठीने हल्ला; गुन्हा दाखल**

**माढ्यात सख्या चुलत्याने पुतण्यावर केला काठीने हल्ला; गुन्हा दाखल** 

**KDM NEWS प्रतिनिधी माढा**अकुलगाव (ता. माढा):** पाण्याच्या पाळीवरून सुरू असलेल्या वादातून सख्या चुलत्याने आपल्या १८ वर्षीय पुतण्याला लाकडी काठीने मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना अकुलगाव (ता. माढा) येथे घडली आहे. या प्रकरणी माढा पोलीस ठाण्यात चुलता आणि चुलती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                   घटनेचा तपशील
मिळालेल्या माहितीनुसार,  प्रणव कानिफनाथ घोडके (वय १८) हा तरुण ९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आपल्या उसाच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेती गट नंबर ३२७ मधील सामाईक विहिरीवर गेला होता. प्रणवने पाण्याची मोटर चालू केली असता, त्याचे चुलते  बापू हंबीरराव घोडके आणि चुलती  अणुजा बापू घोडके यांनी मोटर बंद केली.
प्रणवने मोटर बंद करण्याचे कारण विचारले असता, दोघांनीही त्याला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. "आमची शेती भिजवल्याशिवाय तुम्ही विहिरीवर यायचे नाही," असे म्हणत त्यांनी वाद उकरून काढला.
 वडिलांना वाचवण्यासाठी गेला अन् जखमी झाला वादाचा आवाज ऐकून प्रणवचे वडील कानिफनाथ घोडके त्या ठिकाणी आले. त्यांनाही बापू घोडके यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आपल्या वडिलांना वाचवण्यासाठी प्रणव मध्यस्थी करण्यास गेला असता, रागाच्या भरात बापू घोडके यांनी हातातील लाकडी काठीने प्रणवच्या डोक्यात आणि अंगावर जोरदार प्रहार केला. या हल्ल्यात प्रणव गंभीर जखमी झाला आहे. मारहाण केल्यानंतर "पुन्हा विहिरीवर आलात तर जिवे मारू," अशी धमकीही संशयित आरोपींनी दिली.
                 पोलीस कारवाई
घटनेनंतर जखमी प्रणवने आपला भाऊ प्रथमेश याला बोलावून घेतले आणि थेट माढा पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याला तात्काळ **ग्रामीण रुग्णालय कुडवाडी येथे उपचारासाठी पाठवले. उपचार पूर्ण झाल्यानंतर प्रणवने दिलेल्या फिर्यादीवरून बापू हंबीरराव घोडके आणि अणुजा बापू घोडके यांच्याविरुद्ध मारहाण, शिवीगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
          
KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल