**बार्शी हादरली! झाडबुके मैदानात एका कुटुंबावर जमावाचा भीषण हल्ला; महिलेसह तिघे जखमी**

**बार्शी हादरली! झाडबुके मैदानात एका कुटुंबावर जमावाचा भीषण हल्ला; महिलेसह तिघे जखमी** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** बार्शी येथे ८ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास बार्शी शहरातील झाडबुके मैदान परिसरात एका कुटुंबावर बेकायदेशीर जमावाने निर्घृण हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात फिर्यादी महिला, तिची मुलगी व दोन दीर जखमी झाले असून, दोघांच्या डोक्यात वीट मारल्याने गंभीर दुखापत झाली आहे.

पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार, पुजा चव्हाण झाडबुके मैदान, बार्श  यांनी सांगितले की, त्यांची मुलगी आरोही दुकानाकडे जात असताना तुषार लोखंडे, कृष्णा लोखंडे व सुनिल गायकवाड यांनी तिला चिडविले. ही बाब विचारण्यासाठी पुजा तिथे गेल्या असता, सुमन मोहन लोखंडे, नर्मदा नितीन गायकवाड व दिपाली विनोद बनसोडे यांनी त्यांचे केस पकडून लाथा-बुक्क्यांनी मारहाण सुरू केली.

त्याचवेळी नितीन जालिंदर गायकवाड, तुषार मोहन लोखंडे व सुनिल नितीन गायकवाड यांनी बेकायदेशीर जमाव जमवून पुजा यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी चव्हाण कुटुंबाच्या घरावर दगड फेकले. यावेळी पुजाच्या दीर संतोष अंकुश चव्हाण व किशोर उर्फ बाळा अंकुश चव्हाण यांच्या डोक्यात वीट मारून त्यांना जखमी करण्यात आले.

मारहाणीत जखमी झालेल्या सर्वांना प्रथम उपचारासाठी बार्शी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर जखमी कुटुंबीय थेट बार्शी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आले.

**फिर्यादीत नावे असलेले आरोपी :**  
१. सुमन मोहन लोखंडे  
२. नर्मदा नितीन गायकवाड  
३. दिपाली विनोद बनसोडे  
४. नितीन जालिंदर गायकवाड  
५. तुषार मोहन लोखंडे  
६. सुनिल नितीन गायकवाड  

सर्व आरोपी झाडबुके मैदान, बार्शी येथेच राहतात.या घटनेमुळे झाडबुके मैदान परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिकांनी सांगितले की, छोट्या कारणावरून असे हिंसक प्रकार वाढत आहेत. बार्शी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी भेट देत असून, जखमींच्या वैद्यकीय अहवालानुसार कलमे लावून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून चौकशी सुरू
बार्शी पोलीस ठाण्याचे अधिकारी म्हणाले, “फिर्यादी जबाब नोंदवला गेला असून, सर्व पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

ही घटना बार्शी शहरातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणणारी आहे. स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीने कारवाईची मागणी केली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल