**येरमाळा : येडेश्वरी देवीच्या पालखीला पोलिसी बंदोबस्तावर हल्ला; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा**
**येरमाळा : येडेश्वरी देवीच्या पालखीला पोलिसी बंदोबस्तावर हल्ला; शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा**
**KDM NEWS प्रतिनिधी येरमाळा ** येरमाळा येथील प्रसिद्ध येडेश्वरी देवीच्या चैत्र पौर्णिमा यात्रेदरम्यान पालखी सोहळ्यात शासकीय बंदोबस्त करणाऱ्या पोलिसांवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपींनी पोलिसांना धक्के देऊन बाजूला केले आणि पालखीचे खांदेकरी वैभव बारकुल यांना मारहाण केली. या प्रकारामुळे शासकीय कामात मोठा अडथळा निर्माण झाला.
ही घटना मंगळवारी (७ एप्रिल) संध्याकाळी साडेसहा ते सात वाजेदरम्यान येरमाळा येथील बाजार चौकात घडली. येडेश्वरी देवीची पालखी गावातून डोंगराकडे नेण्यात येत असताना येरमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक तात्याराव रुपाजी भालेराव व त्यांचा कर्मचारी वर्ग मंदिराकडे पायी जात होता. यावेळी पवन जाधव (रा. टेंभुर्णी, जि. सोलापूर) आणि राकेश कसबे (रा. येरमाळा, ता. कळंब) या दोघांनी अचानक हल्ला चढवला.
येडेश्वरी देवी ही तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण मानली जाते. दरवर्षी यात्रेला हजारो भाविक गर्दी करतात. यंदा यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित होते. पालखी डोंगराकडे जात असताना झालेल्या या गोंधळामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक भालेराव यांनी स्वतः फिर्याद दिली. त्यांच्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम १३२, ११५(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील भोंजुडे करत आहेत.
यात्रेदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या