**सोलापूर : ५१ फुटी बजरंगबली मूर्ती साकार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच अनावरण**

**सोलापूर : ५१ फुटी बजरंगबली मूर्ती साकार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लवकरच अनावरण** 

**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर ** :सोलापूर शहरातील मड्डी वस्ती (भवानी पेठ, जुना तुळजापूर नाका परिसर) येथे वडार महाराष्ट्र संघटनेच्या वतीने वडार समाजाने ५१ फुटी उंचीची भव्य बजरंगबली (हनुमान) मूर्ती तयार केली आहे. ही मूर्ती तब्बल १० वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर साकारली असून, लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तिचे अनावरण होणार आहे.

वडार महाराष्ट्र संघटनेचे राज्य उपाध्यक्ष शंकर चौगुले यांनी सांगितले की, “प्रत्येक समाजाचे एक श्रद्धास्थान असते. वडार समाजाचे आराध्य दैवत बजरंगबली असल्याने राज्याच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर येथे ही मूर्ती उभारण्यात आली आहे. यासाठी १० वर्षांचा कालावधी लागला. मूर्तिकार शेखर शहाणे यांनी ही मूर्ती साकारली आहे.”

यानिमित्ताने समाज बांधवांना संघटित करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. हनुमान जयंतीच्या पूर्वसंध्येला दुग्धाभिषेक करण्यात आला. जयंतीदिनी महाआरती व महाप्रसाद कार्यक्रम घेण्यात आला. यासोबत धार्मिक कार्यक्रम व संघटनेचे मेळावे आयोजित करून समाजात जागृती निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे चौगुले यांनी नमूद केले.

अनावरण समारंभात मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, शहरातील सर्व आमदार, अधिकारी, पदाधिकारी व मंत्र्यांची उपस्थिती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. “समाजाला एकसंघ बनवून बळकटी निर्माण करण्याची प्रेरणा बजरंगबलीच्या माध्यमातून मिळत आहे. ही मूर्ती त्याच उद्देशाने उभारली आहे,” असेही शंकर चौगुले यांनी स्पष्ट केले.

खाण संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण विटकर, समाजाचे पाटील बाबुराव निंबाळकर, विष्णू मुधोळकर, अरुण चौगुले, राजू चौगुले, शंकर बा. चौगुले, बालाजी निंबाळकर, राजू निंबाळकर, अबू चौगुले, दिलीप भांडेकर, नागनाथ निंबाळकर, लंहू बंदपट्टे, रवी शिंदे, अनिल चौगुले यांच्यासह अनेक पदाधिकारी यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत.

ही मूर्ती वडार समाजाचे एकत्रीकरण व सांस्कृतिक जागृतीचे प्रतीक ठरणार असल्याचे समाज बांधवांनी सांगितले.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल