**सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी**
**सोलापूरचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी**
**KDM NEWS प्रतिनिधी पंढरपूर, दि. ४ :- ** सोलापूर जिल्ह्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी आज श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. पदभार स्वीकारण्यापूर्वी त्यांनी पत्नीसह पंढरपूर येथे विशेष भेट दिली.
मंदिर समितीच्या वतीने सदस्या शकुंतलाताई नडगिरे व नगराध्यक्षा प्रणिता भालके यांनी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांचा उपरणे देऊन व श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेची मूर्ती भेट देऊन सत्कार केला. यावेळी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी पंढरपूर तालुका प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला.
उपस्थित प्रमुख पदाधिकारी म्हणजे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे, तहसीलदार सचिन लंगुटे, मुख्याधिकारी महेश रोकडे व मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले होते. यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. यांनी पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर संवर्धन व जीर्णोद्धार कामांची माहिती घेतली. मंदिर समितीचे व्यवस्थापक संदेश भोसले यांनी सध्या सुरू असलेल्या विविध कामांचा सविस्तर आढावा दिला.
कार्तिकेयन एस. हे २०२० बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. यापूर्वी ते कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. सोलापूर जिल्हाधिकारीपदाची सूत्रे स्वीकारताना त्यांनी प्रथमच पंढरपूर येथे येऊन विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या