​कायद्याला खुंटीवर टांगले! वराचे वय २८, वधू अवघ्या १७ ची; सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई

**कायद्याला खुंटीवर टांगले! वराचे वय २८, वधू अवघ्या १७ ची; सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई**

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील वैराग पोलिस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ च्या कलम १०, ११ व २ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १७ वर्षीय बालिका राजनंदिनी बालाजी चुंगे (जन्म २८ डिसेंबर २००९) यांचा ५ डिसेंबर २०२५ रोजी २८ वर्षीय अभिमन्यू खंडेराव पाटील यांच्याशी संगमनेर, ता. बार्शी येथे बालविवाह झाल्याची घटना समोर आली आहे.

पुणे शहर बालविकास प्रकल्प कार्यालयातील सहायक बालविवाह प्रतिबंध अधिकारी स्वाती सुभाष पथाडे यांनी ३ एप्रिल २०२६ रोजी रात्री १०.३० वाजता दिलेल्या लेखी फिर्यादीवरून ही कारवाई सुरू झाली. फिर्यादी स्वाती पथाडे १७ वर्षांपासून या क्षेत्रात कार्यरत आहेत. २ एप्रिल २०२६ रोजी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी चाईल्ड हेल्पलाइन (१०९८) वर आलेल्या तक्रारीनुसार माहिती दिली होती. त्यानुसार स्वाती पथाडे, सुरेखा सर्जेराव कांबळे (सीसीडीटी संस्था), मोनिका गुलाब जाधव (चाईल्ड हेल्पलाइन) आणि अंगणवाडी सेविका लक्ष्मी मनोज महाले यांनी १ एप्रिल २०२६ रोजी पुण्यातील बिबवेवाडी, अप्पर इंदिरानगर येथील बालिकेच्या घरी भेट दिली.

घरात राजनंदिनी गळ्यात मंगळसूत्र घालून आढळली. आई सुवर्णा बालाजी चुंगे (४१) यांनी विचारणा केल्यावर सांगितले की, “नळदुर्ग येथील नातेवाईकांच्या धार्मिक कार्यक्रमात मुलीला स्थळ सुचविले गेले. दोघांची पसंती झाल्याने ५ डिसेंबर २०२५ रोजी अभिमन्यू खंडेराव पाटील यांच्या घराच्या दारातच विवाह लावण्यात आला.” बालिकेचे जन्म प्रमाणपत्र आणि अंगणवाडी जन्म-मृत्यू नोंदवही तपासून खात्री झाली की तिचे वय १७ वर्षे आहे.

**आरोपींची नावे व पत्ते :**  
१. सुवर्णा बालाजी चुंगे (आई, ४१ वर्षे) – अण्णा भाऊ साठे वसाहत, अप्पर इंदिरानगर, बिबवेवाडी, पुणे  
२. बालाजी गुंडा चुंगे (वडील, ४५ वर्षे, मंडप बांधकाम व्यवसाय) – वरीलच पत्ता  
३. खंडेराव पाटील (मुलाचा वडील) – संगमनेर, ता. बार्शी, जि. सोलापूर  
४. सुरेखा खंडेराव पाटील (मुलाची आई) – वरीलच पत्ता  
५. अभिमन्यू खंडेराव पाटील (वधू, २८ वर्षे) – वरीलच पत्ता  

घटना संगमनेर, ता. बार्शी, जि. सोलापूर येथे घडली असून, बालिका पुण्यात राहते. वैराग पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल