**बार्शीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध पोक्सो व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल**

**बार्शीत १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीविरुद्ध पोक्सो व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल** 
**बार्शी (सोलापूर) -** बार्शी शहरातील एका निवासी परिसरात ४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी २ ते ३ च्या दरम्यान एका १२ वर्ष १० महिन्यांच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने मुलीला आपल्या मोटारसायकलवर बसवून आपल्या घरी नेले आणि तिच्याशी अश्लील वर्तन करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न करणारे कृत्य केल्याचा आरोप आहे. 

बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली असून, आरोपी (रा. बार्शी, नाव गुप्त ठेवण्यात आले) विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ७४, लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत कलम ८ आणि १२, तसेच अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्यांतर्गत कलम ३(१)(w)(i), ३(१)(w)(ii) आणि ३(२)(va) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

फिर्यादी महिला (वय ३० वर्षे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या कपडे धुण्यासाठी घराबाहेर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांची १२ वर्ष १० महिन्यांची मुलगी घरात एकटी होती. याचा गैरफायदा घेत आरोपीने मुलीला मोटारसायकलवर बसवून आपल्या घरी नेले. तेथे त्याने तिच्याशी अश्लील चाळे केले. 

मुलगी घरी न दिसल्याने फिर्यादीने परिसरात शोध घेतला. त्यावेळी आरोपीच्या घराच्या मागील बाजूने मुलगी रडत धावत आली. घरी आल्यावर मुलीने आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबाने तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली.

पोलिसांनी तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल केला असून, प्रकरणाचा पुढील तपास गांभीर्याने सुरू आहे. पीडित मुलीच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया वेगाने राबवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. 

पीडित मुलीचे वैद्यकीय तपासणी व पुरावे संकलनाचे काम सुरू असून, आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न चालू आहेत. ही घटना बार्शी शहरात खळबळ माजवणारी ठरली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल