**बार्शी नगरपरिषदेच्या २६८ विकासकामांवर ठेकेदारांच्या विलंबाबाबत नगरसेवकांची तक्रार**

**बार्शी नगरपरिषदेच्या २६८ विकासकामांवर ठेकेदारांच्या विलंबाबाबत नगरसेवकांची तक्रार** 

**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर) :** बार्शी शहरातील २६८ विकासकामांची मुदत संपूनही अनेक कामे अपूर्ण किंवा मंद गतीने चालू असल्याबाबत नगरसेवकांनी मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांच्याकडे आज लिखित तक्रार दाखल केली. या कामांमुळे सार्वजनिक निधीचा अपव्यय होत असल्याचा आरोप करत ठेकेदारांसह जबाबदार अधिकाऱ्यांवर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई करण्याची मागणी केली आहे.

२०२५-२६ च्या सुधारित अर्थसंकल्पात आणि २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात पान क्र. ५८ ते ७२, नमुना क्र. ८८ अंतर्गत ही २६८ कामे विविध ठेकेदारांना देण्यात आली होती. प्रत्यक्ष पाहणी आणि स्थानिक नागरिकांच्या तक्रारींवरून असे दिसून आले की, करारातील निश्चित मुदत संपूनही अनेक कामे अपूर्ण अवस्थेत आहेत, तर काही ठिकाणी प्रगती अत्यंत मंद आहे.

नगरसेवक आक्कलकोटे यांच्या नेतृत्वात सर्व नगरसेवकांच्या वतीने स्मरणपत्र देण्यात आले. यावेळी बारबोले, राहुल कोंढारे, लांडगे, नवनाथ माळगे, मुजमील पठाण, सचिन मांगडे, सौ. पाचपुते , बाळासाहेब पवार, वसंत देवकर, अजय भानवसे, भैरू शिंदे, सोनू नायकोजी, आकाश राऊत आदी उपस्थित होते.

तक्रारीत म्हटले आहे की, महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५, नगरविकास विभागाच्या शासन निर्णयांनुसार लागू PWD Pattern Contract Conditions, करारातील क्लॉज-२ (विलंब दंड) आणि क्लॉज-३ (करार रद्द करणे) यांचे उल्लंघन होत आहे. यामुळे नागरिकांना मूलभूत सुविधा वेळेत मिळत नाहीत आणि प्रशासनावरील अविश्वास वाढतो आहे.

मागण्या :
- २६८ कामांची स्वतंत्र तांत्रिक व प्रशासकीय चौकशी करावी.
- संबंधित ठेकेदारांना कारणे दाखवा नोटीस द्यावी.
- विलंब दंड (Liquidated Damages) तात्काळ आकारावा.
- समाधानकारक उत्तर न मिळाल्यास करार रद्द करून Security Deposit/EMD जप्त करावे.
- अपूर्ण कामे Risk & Cost पद्धतीने पूर्ण करून अतिरिक्त खर्च ठेकेदारांकडून वसूल करावा.
- दोषी ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करावे.
- अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबाबत शिस्तभंगाची कारवाई करावी.
- उच्चस्तरीय चौकशी करून ३० दिवसांत अहवाल सादर करावा.

तक्रारकर्त्यांनी सांगितले की, गांभीर्याने दखल न घेतल्यास लोकायुक्त, उच्च न्यायालय किंवा सक्षम प्राधिकरणाकडे पुढील कार्यवाही करण्याचा अधिकार राखून ठेवला आहे.

ही बाब बार्शी नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ हाताळावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

KDM NEWS प्रतिनिधी 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**बनावट खतांच्या मोठ्या साठ्यावर कृषी विभागाची धडक कारवाई; सोलापूरमध्ये शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक उघड, दोघांवर गुन्हा दाखल**

**बार्शी बाजार समितीत शेतकऱ्यांची लूट: वरद ट्रेडर्सच्या चोरीचा व्हिडिओ व्हायरल, ड्रायव्हरांना कमिशन देऊन माल आणण्याचा गोरखधंदा**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल