**बार्शी :** शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोलापूर जिल्हा प्रमुखपदी प्रवीण काकडे यांची नियुक्ती**
**बार्शी :** शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने सोलापूर जिल्हा प्रमुखपदी प्रवीण काकडे यांची नियुक्ती**
**KDM NEWS प्रतिनिधी बार्शी**प्रवीण काकडे हे गेल्या दहा वर्षांपासून बार्शी तालुकाप्रमुख म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
नवीन जबाबदारीनुसार मोहोळ, बार्शी आणि माळशिरस या तीन तालुक्यांच्या संघटनेची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये या नियुक्तीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांच्या अनुभवाचा फायदा पक्ष वाढीसाठी होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
सर्वसामान्य शिवसैनिकांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव सुरू आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या