**शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी सहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर निलंबित**
**शेतकऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी सहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर निलंबित**
**KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर, दि. २ :** दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव येथे शेतकऱ्याला दूरध्वनीवरून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी सहाय्यक कृषी अधिकारी अमोल नामदेव देवकर यांना कृषी विभागाने तात्काळ निलंबित केले आहे.
कासेगाव येथील शेतकरी अजित जाधव यांना फोनवर अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप देवकर यांच्यावर आहे. या घटनेनंतर कासेगाव ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व गावातील अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षरीसह २९ मे २०२६ रोजी कृषी विभागाकडे लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती.
तक्रारीची दखल घेत विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयाने प्राथमिक तपासणी केली. तपासणीनंतर २९ मे २०२६ रोजीच अमोल देवकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. या प्रकरणी पुणे विभागीय कृषी सहसंचालक दत्तात्रय गावसाने यांनी आदेश जारी केले.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितले की, “सदर प्रकरणी पुढील प्रशासकीय कार्यवाही नियमानुसार करण्यात येईल.”
यापूर्वीही देवकर यांच्या कार्यपद्धतीबाबत सरपंच यशपाल वाडकर यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याऐवजी उद्धट वर्तन व शिवीगाळ करणे ही बाब गंभीर मानली जात आहे.
या कारवाईमुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या