पोस्ट्स

अजित पवार मुस्लिम आरक्षणासाठी सरसावले; दिलं "हे' आश्वासन

इमेज
मुस्लिम समाजाला शैक्षणिक प्रवेशांमध्ये पाच टक्के कोटा ठेवण्याबाबत आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याशी चर्चा करणार आहोत असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.तत्कालीन कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने सन 2014 मध्ये मराठा समाजासाठी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण लागू करताना मुस्लिमांनाही शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 5 टक्के आरक्षण दिले होते. पण त्यानंतरच्या भाजप-शिवसेना सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणताना मुस्लिम कोटा रद्द केला होता. मंत्रालयात अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या बैठकीत बोलताना अजित पवार म्हणाले की, अल्पसंख्याक समाजासाठी पाच टक्के शैक्षणिक कोट्याला मराठा आरक्षणाप्रमाणे कोणत्याही कायदेशीर अडथळ्याचा सामना करावा लागला नाही. याबाबत निर्णय घेण्यापूर्वी मी शिंदे आणि फडणवीस यांच्याशी चर्चा करेन, असे ते म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (बार्टी), छत्रपती शाहू महाराज संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (सारथी), महात्मा ज्योतिबा फुले संशोधन आणि प्रशिक्षण संस्था (महाज्योति) यांसारख्या संस्थांच्या माध्यम...

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल संपूर्ण माहितीबहुजनांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले. शिक्षण आणि श्रम यांची सांगड घालून सक्षम पिढी घडवण्याचा आदर्श त्यांनी निर्माण केला. विद्यार्थ्यांना कमवा आणि शिका हा मूलमंत्र देणारे शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!

इमेज
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबद्दल संपूर्ण माहिती भाऊरावांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी एका जैन कुटूंबात झाला. त्यांचे वडिल इस्ट इंडिया कंपनीत लिपिक म्हणून नोकरीस होते. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. त्यांच्या पणजोबांचे नाव देवगौडा, वडिलांचे नाव पायगौडा तर आईचे नाव गंगाबाई असे होते.भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण कुंभोज, दहिवडी, विटे इत्यादी ठिकाणी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला. पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या क...

राजकारण्यांनो, तुमचं हिंदू-मुस्लिम सुरू राहू द्या... बारामतीत धर्माच्या भिंती ओलांडून मुस्लिम कुटुंबाने बसवल्या गौराई!

इमेज
राजकारण्यांनो, तुमचं हिंदू-मुस्लिम सुरू राहू द्या... बारामतीत धर्माच्या भिंती ओलांडून मुस्लिम कुटुंबाने बसवल्या गौराई!एकीकडे अवघ्या देशभरात हिंदू- मुस्लिम असं राजकारण होत असताना शेख कुटुंबाने हिंदू सणांद्वारे हिंदू- मुस्लिम एकतेचा संदेश दिला आहे. आपण सर्व एक आहोत, कुठलाही भेदभाव न करता गुण्यागोविंदाने राहिलं पाहिजे, असं आवाहन त्यांनी केलं आहे.जाती धर्माच्या भिंती ओलांडून गौरी-गणपतीची प्रतिष्ठापना केल्याने बारामतीमधील मुस्लिम कुटुंबाचं कौतुक होत आहे. शेख कुटुंब हे गेल्या आठ वर्षापासून गणपतीची प्रतिष्ठापना करत आहे. गणपतीवर त्यांची श्रद्धा आहे. आता यावर्षी शेख कुटुंबाने गौराई बसवल्या आहेत. त्यामुळे परिसरात त्यांचं विशेष कौतुक होतंय. कुठल्याही जाती आणि धर्मामध्ये भेदभाव न करता सर्वांनी एकोप्याने राहावं असा संदेश त्यांनी या माध्यमातून दिला आहे.बारामतीमधील शेख कुटुंब हे कुठल्याही जाती धर्माच्या भेदभावामध्ये न अडकता हिंदू धर्माचा महत्वाचा सण म्हणून पाहिल्या जाणाऱ्या गौरी गणपतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. गेल्या आठ वर्षापासून शेख कुटुंब गणपती बाप्पाची मनोभावे पूजा करून मोठ्य...

बाप्पाला प्रिय दुर्वा, आघाडा, जास्वंदीचे औषधी महत्त्व मोठे

इमेज
बाप्पाला प्रिय दुर्वा, आघाडा, जास्वंदीचे औषधी महत्त्व मोठे गणपती बाप्पाच्या सणावेळी दुर्वा,  आघाडा, जास्वंद यासह 21 वेगवेगळ्या पत्री अर्पण केल्या जातात. भक्तांनी मोदक, खीरीसोबत आयुर्वेदात अनन्य साधारण महत्त्व असणार्‍या या औषधी वनस्पतींचा खाण्यात वापर करावा, यासाठी निसर्गमित्र संस्थेने पुढाकार घेतला आहे.तुळस, देवदार, निर्गुडी, पिंपळ, बोर, रूई, शंखपुष्पी, मरवा, महाका, जास्वंद, कनेर, कनेर, जाई, डाळिंब, डोरली, धोत्रा, शमी, बेल, पळस, अर्जुन, आपटा, हादगा या वनस्पतींचा समावेश आहे.  दुर्वा : औषधी उपयोग : नाकातून रक्त येत असल्यास दुर्वा रस नाकात घालावा. जुन्या जखमा ज्यात दाह जास्त आहे अशांना दुर्वाघृत (तूपामध्ये दुर्वेचा रस घालून तयार केलेले औधी तूप) घालावे. पित्तामुळे उलटी होत असल्यास दुर्वारस तांदळाच्या धुवणाबरोबर साखर घालून द्यावा. लघवी साफ होत नसल्यास दुर्वांच्या मुळांचा काढा करून त्यात साखर व मध घालून घ्यावा. नागीण झाल्यानंतर कच्चे तांदूळ भिजत घालून दुर्वांबरोबर वाटून नागीण उठलेल्या जागेवर लावावा, दाह कमी होतो. आघाडा : ही औषधी वनस्पती आहे तिची मुळे, पाने, फुले, फळे औष...

राज्याच्या 'या' भागात पावसाळा, तर इथं उन्हाच्या झळा; पाहा हवामान अंदाज...

इमेज
यंदा पावसानं राज्याच प्रवेशही उशिरानं केला आणि तो खऱ्या अर्थानं मुसळधार बरसू लागला तोसुद्धा काहीसा उशिरानंच. असा हा पाऊस सध्या गणेशोत्सव गाजवताना दिसत आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत पावसाची हजेरी सध्या पाहायला मिळतेय. त्यातच पुढच्या 24 तासांमध्येसुद्धा पाऊस राज्याच्या बहुतांश भागांना ओलंचिंब करून जाण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. असं असलं तरीही राज्याच्या काही भागांमध्ये मात्र पाऊस उघडीप देणार असून, तिथं उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार ही बाब मात्र नाकारता येत नाही. फक्त कोकणच नव्हे तर, राज्यात सध्या वर्धा, चंद्रपूर, अमरावती यांसारख्या भागांमध्ये चांगला पाऊस होताना दिसत आहे. तिथं मराठवाड्यातही बीड, जालन्यात पावसानं हजेरी लावली आहे. पण, मराठवाड्यातील निवडक जिल्हे वगळता इतर भाग मात्र कोरडाच आहे. इथं मुंबईतही पावसाच्या सरी अधूनमधून आपल्या असण्याची जाणीवर करून देतात. पण, भर दुपारी येणारी सूर्यकिरणं अंगाची काहिली करताना दिसत आहेत. शुक्रवारीसुद्धा शहरात ऊन पावसाचा हा खेळ पाहायला मिळेल. ज्यामुळं वातावरण काही अंशी दमट असेल असा अंदाज वर्तवला जात आहे. हवामान विभागाच्या माहिती...

महाभारत लिहिताना जेव्हा गणेशाचे तापमान वाढले, वेद व्यासांचे उपाय, आणि 'ही' परंपरा सुरू झाली, पौराणिक कथा पाहा

इमेज
महाभारत लिहिताना जेव्हा गणेशाचे तापमान वाढले, वेद व्यासांचे उपाय, आणि 'ही' परंपरा सुरू झाली, पौराणिक कथा पाहाअवघ्या देशभरात श्रीगणेशा  आगमन झाले आहे, भाविक 10 दिवस गणपतीची मनोभावे पूजा करत आहेत, बुधवारी दीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्यात आले. पौराणिक मान्यतेनुसार तसेच अनेक दंतकथांमध्ये गणेश विसर्जनाचा संबंध भगवान गणेशाने महाभारत लिहिल्याच्या घटनेशी जोडला आहे. जाणून घ्या रंजक पौराणिक कथा... ...म्हणून गणेशाने आपला एक दात तोडला प्रचलित समजुतीनुसार, जेव्हा महर्षी वेद व्यास महाभारत लिहिण्यासाठी प्रतिभावान लेखक शोधत होते, तेव्हा गणेशजींनी त्यास होकार दिला. पण त्यांनी एक अटही घातली की जोपर्यंत महर्षी न थांबता बोलतात तोपर्यंत ते सतत लिहीत राहतील. गणेश चतुर्थीच्या दिवसापासून वेदव्यासांनी महाभारताची कथा सांगण्यास सुरुवात केली. गणेशजी सलग 10 दिवस कथा लिहीत राहिले. महर्षि वेदव्यास गणेशांना महाभारताची कथा सांगत होते. लिहिताना अचानक गणेशजीं लेखणी फुटली. त्यांना वाटले की नवीन लेखणी शोधायला वेळ लागेल आणि कथा लिहिण्याचा क्रम खंडित होईल, म्हणून त्यांनी आपला एक दात तोडला आणि तो ले...

एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरल्याने वाढतो का? काय करावं? येथे वाचा सर्व

इमेज
एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरल्याने  वाढतो का? काय करावं? येथे वाचा सर्व गेल्या काही वर्षांपासून क्रेडिट कार्डचा वापर वाढला आहे. अनेक बँका क्रेडिट कार्डवर ऑफर्स देत असतात. तसंत, ऑनलाइन एखादी वस्तू घ्यायची असल्यास पेमेंटवर सूट आणि ऑफर्सदेखील मिळतात.त्यामुळं अनेक जण क्रेडिट कार्ड घेतात. अनेक वेगवेगळ्या बँका कार्डवर विविध ऑफर्स दिले जातात. त्या ऑफर्सना भुलून नागरिक एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड घेतात. मात्र, एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड घेणे खरंच फायद्याचे आहे का. यामुळं तुमच्या सिबील स्कोअरवर नकारात्मक परिणाम पडतो का? हे जाणून घेणे गरजेचे आहे.  क्रेडिट कार्डचे जितके फायदे आहेत तितकेच तोटेही आहेत. त्यामुळं तुमच्याकडे एकापेक्षा किती क्रेडिट कार्ड असावेत याची माहिती असणे गरजेचे आहे. सगळ्यात पहिले तर क्रेडिट कार्ड कसं मिळतं हे जाणून घेऊया. तुमचा पगार आणि बँकेचा सिबिल स्कोअर तपासून तुम्हाला बँकेकडून क्रेडिट कार्ड ऑफर केले जाते. पगार पाहूनच या क्रेडिट कार्डची लिमिटदेखील ठरवली जाते. कधी कधी क्रेडिट कार्डवरुनही तुमचा सिबिल स्कोअर ठरु शकतो.  तुमच्याकडे एकापेक्षा जा...