**सोलापूरात अतिवृष्टी आणि पुराचे तांडव: पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश**
**सोलापूरात अतिवृष्टी आणि पुराचे तांडव: पंचनामे तातडीने पूर्ण करण्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे निर्देश** **KDM NEWS प्रतिनिधी**सोलापूर, २६ ऑगस्ट २०२५*सोलापूर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीने शेती, घरे आणि जनावरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून शेतकरी आणि नागरिकांना त्वरित मदत मिळवून देण्याचे निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे नुकत्याच झालेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे यांनी प्रशासनाला स्पष्ट सूचना दिल्या की, “नुकसानग्रस्त एकही शेतकरी किंवा नागरिक पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची विशेष काळजी घ्या.” या बैठकीला आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदिप जंगम, पोलीस आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी, सर्व तहसीलदार आणि तालुका कृषी अधिकारी उपस्थित...