*सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार? छगन भुजबळांचे स्पष्ट संकेत, राष्ट्रवादीची बैठक महत्त्वाची*
*सुनेत्रा पवार उद्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार? छगन भुजबळांचे स्पष्ट संकेत, राष्ट्रवादीची बैठक महत्त्वाची* *KDM NEWS प्रतिनिधी मुंबई, ३० जानेवारी २०२६ : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदासाठी सुनेत्रा पवार यांचे नाव जवळपास निश्चित झाले असून, उद्या (३१ जानेवारी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटाच्या बैठकीत त्यांची विधिमंडळ पक्षनेत्या म्हणून निवड होण्याची दाट शक्यता आहे. या निर्णयानंतर त्यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधीही उद्याच होऊ शकतो, असे पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. छगन भुजबळ म्हणाले, "अजितदादा गेले आणि ज्या पद्धतीने ते गेले ते पाहून झोप उडाली. शेवटी शो मस्ट गो ऑन. कुणाकडे तरी जबाबदारी देऊन पक्ष चालवला पाहिजे. उद्या विधान मंडळाचे सदस्य आहेत. त्यांची बैठक बोलावली आहे. त्यात विधान मंडळ प्रमुखपद अजितदादांकडे होतं, ते पद कोणाकडे द्यायचं? याबाबत निर्णय होईल. सुनेत्रा ताईंकडे पद देण्याची मागणी आहे. ते रास्त आहे. टीव्हीलाही मी ऐकत आहे. ते काही चूक आहे असं वाटत नाही. उपमुख्यमंत्री पदाची जागा रिक्...