*नागपूर पोलिसांचा हायटेक पॅटर्न! आता तक्रार नोंदवण्यासाठी लागणार फक्त ३ मिनिटे; AI आणि व्हॉइस टायपिंगचा असा होतोय वापर*
*नागपूर पोलिसांचा हायटेक पॅटर्न! आता तक्रार नोंदवण्यासाठी लागणार फक्त ३ मिनिटे; AI आणि व्हॉइस टायपिंगचा असा होतोय वापर* *KDM NEWS प्रतिनिधी नागपूर : पूर्वी पोलिस ठाण्यात अदखलपात्र तक्रार नोंदवण्यासाठी १५ ते २५ मिनिटे लागत असत. आता मात्र अवघ्या ३ मिनिटांत ही प्रक्रिया पूर्ण होत आहे. नंदनवन पोलीस ठाण्याने सुरू केलेल्या नव्या प्रणालीत कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), व्हॉइस टायपिंग आणि व्हॉट्सअॅपचा वापर करून तक्रार नोंदणी सुलभ केली आहे. या प्रयोगामुळे पोलिसांचा वेळ वाचतो, मानवी चुका कमी होतात आणि तक्रारदारांना तात्काळ प्रत मिळते. नंदनवन ठाणेदार कैलास देशमाने यांच्या पुढाकाराने ही प्रणाली विकसित करण्यात आली. तक्रारदार व्हॉट्सअॅपवर व्हॉइस टायपिंग करतो. ही टंकलेखन केल्यानंतर AI च्या मदतीने तांत्रिक दुरुस्ती होते. नंतर ही तक्रार पोलिसांच्या व्हॉट्सअॅप गटातील CCTNS टीमला पाठवली जाते. ठाण्यातील अंमलदार फक्त कॉपी-पेस्ट करून तक्रार नोंद घेतात. त्याच वेळी ती पोलीस डायरी आणि CCTNS प्रणालीवरही अपडेट होते. पूर्वी ही संपूर्ण प्रक्रिया वेळखाऊ होती – डायरी नोंद, CCTNS टंकलिखित नोंद आणि प्रत...