**खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल**
**खताचा काळाबाजार आणि साठेबाजीवर कृषी विभागाची मोठी कारवाई ; ११३ परवान्यांवर कारवाई, ७ गुन्हे दाखल** **KDM NEWS प्रतिनिधी सोलापूर , दि.१९ : शेतकऱ्यांना दर्जेदार आणि रास्त दरात खतांचा पुरवठा व्हावा यासाठी कृषी विभागामार्फत पुणे विभागातील पुणे, अहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये खत विक्री केंद्रांची कडक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. एप्रिल २०२६ पर्यंत विभागात नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत १०७ खत विक्री परवाने निलंबित आणि ६ खत विक्री परवाने रद्द करण्यात आले आहेत, तर ७ केंद्रांवर गुन्हे (एफआयआर) दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती विभागीय कृषी सहसंचालक बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली आहे. या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात एकूण २ हजार ५७६ परवानाधारक केंद्रांची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान २८१ प्रकरणांमध्ये काळाबाजार झाल्याचे समोर आले असून, २७७ केंद्रांना 'कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील ६५० केंद्रांची तपासणी करण्यात आली. यापैकी ७१ प्रकरणांत अनियमितता आढळली असून २७ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. अह...