**बार्शी तालुक्यातील पानगाव PHC कुलूपबंद प्रकरण: दोषी दोन्ही डॉक्टरांना २ दिवसांचा अल्टिमेटम, निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा पातळीवर**
**बार्शी तालुक्यातील पानगाव PHC कुलूपबंद प्रकरण: दोषी दोन्ही डॉक्टरांना २ दिवसांचा अल्टिमेटम, निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा पातळीवर** **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी/पानगाव, दि. २० जून २०२६:** पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात (PHC) अपघातातील गंभीर जखमी तरुणाला उपचार न मिळाल्याने खाजगी रुग्णालयात हलवावे लागल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर प्रशासनाने तातडीने कडक कारवाई सुरू केली आहे. दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा' नोटीस बजावण्यात आली असून, त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठविण्यात आला आहे. १८ जून रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जवळगाव येथील राहुल अर्जुन कापसे हा तरुण सोलापूर रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत गंभीर जखमी झाला. त्याचा उजवा खांदा आणि हात रक्तबंबाळ झाला होता. स्थानिक नागरिक अरुण मस्तूद, पिंटू नाईकवाडी आणि प्रशांत गायकवाड यांनी त्याला तातडीने पानगाव PHC वर आणले. मात्र, केंद्राचे मुख्य गेट कुलूपबंद होते. रुग्णवाहिका उभी होती, परंतु चालक गायब. उपस्थित कर्मचाऱ्यांकडे गेटची चावी नव्हती आणि दोन्ही डॉक्टर अनुपस्थित होते. प्राथमिक उपचार न म...