**बार्शी तालुक्यातील २१ गावांना सिंचनाचा दिलासा; उपसा योजनेच्या बचत पाण्याचे नियोजन**
**बार्शी तालुक्यातील २१ गावांना सिंचनाचा दिलासा; उपसा योजनेच्या बचत पाण्याचे नियोजन** **KDM NEWS प्रतिनिधी बार्शी (सोलापूर):** बार्शी तालुक्यातील धोत्रे ते यावली दरम्यानच्या २१ दुष्काळग्रस्त गावांना बार्शी उपसा सिंचन योजनेमधून बचत होणारे ०.६६ टी.एम.सी. पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. याबाबत मुंबईत लवकरच उच्चस्तरीय बैठक होणार असल्याचे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी संकेत दिले आहेत. या संदर्भात आमदार राजेंद्र राऊत यांनी नुकतीच मुंबईत विधानभवनात जलसंपदा मंत्र्यांची भेट घेतली आणि मागणीचे पत्र सुपूर्द केले. या २१ गावांमध्ये वर्षानुवर्षे पाण्याची टंचाई आणि दुष्काळाची समस्या भासत आहे. आमदार राऊत यांनी सातत्याने या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. **योजना अशी:** बार्शी उपसा सिंचन योजनेतून बचत झालेले ०.६६ टी.एम.सी. पाणी तावडीच्या तळ्यात आणण्यात येणार आहे. तेथून बंद पाईपलाइनद्वारे हे पाणी २१ गावांपर्यंत पोहोचवले जाईल. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल. आमदार राजेंद्र रा...