**HSRP बसविण्याची अंतिम तारीख ३० जून; १ जुलैपासून कडक कारवाई**
**HSRP बसविण्याची अंतिम तारीख ३० जून; १ जुलैपासून कडक कारवाई**
**KDM NEWS प्रतिनिधी मुंबई:** राज्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक प्लेट (HSRP) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२६ आहे. या मुदतीनंतर १ जुलैपासून HSRP न बसविलेल्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई सुरू होणार असून, आरटीओमधील अनेक महत्त्वाच्या सेवाही रोखल्या जाणार आहेत.
HSRP न बसविलेल्या वाहनांना वाहन हस्तांतरण, पत्ता बदल, कर्जबोजा नोंदणी किंवा उतरणे, पुनर्नोंदणी, वाहनातील बदल आणि परवाना नूतनीकरण यासारख्या आरटीओ सेवांपासून वंचित राहावे लागणार आहे. मात्र, फिटनेस प्रमाणपत्राच्या नूतनीकरणासाठी ही अट लागू राहणार नाही.
**अपॉइंटमेंट घेतलेल्यांना दिलासा:**
३० जूनपर्यंत अधिकृत एजन्सीकडून HSRP बसविण्यासाठी अपॉइंटमेंट घेतलेल्या वाहनधारकांना १ जुलैपासून सुरू होणाऱ्या दंडात्मक कारवाईतून तात्पुरता दिलासा देण्यात आला आहे.
**तीन झोन आणि नियुक्त कंपन्या:**
HSRP बसविण्याचे काम राज्यात तीन झोनमध्ये विभागले आहे.
- **झोन १:** रोझमेर्टा टेक्नॉलॉजीज लिमिटेड
- **झोन २:** रिअल इंडस्ट्रीज लिमिटेड
- **झोन ३:** एफटीए HSRP सोल्यूशन्स प्रा. लि.
**निश्चित दर:**
शासनाने HSRP बसविण्यासाठी दर निश्चित केले आहेत (फिटमेंट शुल्कासह, जीएसटी वगळून):
- दुचाकी: ४५० रुपये
- तीनचाकी: ५०० रुपये
- हलकी मोटार वाहने, मध्यम व अवजड व्यावसायिक वाहने: ७४५ रुपये
केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ (नियम ५०) आणि मोटार वाहन अधिनियम कलम १७७ अंतर्गत पोलीस आणि परिवहन विभाग संयुक्त किंवा स्वतंत्रपणे कारवाई करतील. सर्व शासकीय आणि निमशासकीय विभागांनी आपल्या ताब्यातील वाहनांवर ३० जूनपूर्वी HSRP बसवून घ्यावेत, असे आवाहन परिवहन विभागाचे सह आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.
वाहनधारकांनी मुदतीत HSRP बसवून नियमांचे पालन करावे, असे आवाहन विभागाने केले आहे.
KDM NEWS प्रतिनिधी
टिप्पण्या