चंद्रयान-३ लँडिंग कधी करणार ,कुठे पाहता येणार थेट प्रसारण. जाणून घ्या सविस्तर
इस्त्रोने दिलेल्या माहितीनुसार, 'चांद्रयान-३' ची चंद्रावर सॉफ्ट लँडिंग ठरलेल्या वेळेत होणार आहे. भारतीय विज्ञान, इंजीनिअरिंग, औद्योगिक आणि उद्योगासाठी हे मिशन मैलाचा दगड ठरणार आहे. अंतराळातील भारताच्या प्रगतीचं हे प्रतिक असेल. मिशन वेळेत पूर्ण होईल. त्यामुळे सिस्टिमची वारंवार पाहणी केली जात आहे. तसेच या मिशनमध्ये भाग घेणारी लोक अत्यंत उत्साहाने काम करत आहेत. त्यांचा उत्साह वाखणण्यासारखा आहे.
'चांद्रयान-३' आज बुधवारी २३ ऑगस्ट २०२३ रोजी चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार. त्यामुळे संपूर्ण देशाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. हे सॉफ्ट लँडिंग याची देही याची डोळा पाहण्यासाठी देशवासिय उत्सुक आहेत. 'चांद्रयान-३' आज संध्याकाळी ६ वाजून ४ मिनिटाने चंद्रावर पाऊल ठेवणार आहे.
चांद्रयान-३ चं कसं होणार लँडिंग?
पहिला टप्पा : या टप्प्यात यानाची लेव्हलपासून ३० किलोमीटरचे अंतर कमी करून ७.५ किलोमीटरपर्यंत आणले जाईल.
दुसरा टप्पा : चंद्राच्या पृष्ठभागापासून ते चांद्रयानाचं अंतर ६.८ मीटर पर्यंतचं असेल. या टप्प्यापर्यंत यानाचा वेग ३५० मीटर प्रति सेकंद असेल. म्हणजे सुरुवात साडेचार पट कमी असेल.
तिसरा टप्पा : यात यानाला चंद्राच्या पृष्ठभागापासून ८०० मीटर उंचीवर नेलं जाईल. इथे दोन थ्रस्टर इंजिन उतरवले जातील. या टप्प्यात यानाचा वेग शून्य टक्के सेकंदाच्या जवळ नेला जाईल.
चौथा टप्पा : या टप्प्यात यानाला पृष्ठभागाच्या १५० मीटरपर्यंत आणलं जाणार आहे. याला व्हर्टिकल डिसेंट म्हणतात. म्हणजे उभी लँडिंग होईल.