मध्यरात्रीच्या नोटीसनंतर रोहित पवारांचं दोन बड्या नेत्यांकडे बोट, शरद पवारांचं एका वाक्यात उत्तर!

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मध्यरात्री महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोटीस देत बारामती ॲग्रोचे  दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.सूडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला आहे. मात्र यावर सविस्तर बोलण्यास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नकार दिला आहे. "मी कारवाईबाबत बोलणार नाही," असं शरद पवार म्हणाले.

कारवाईवर बोलणार नाही : शरद पवार

शरद पवार हे आज बारामतीतील (Baramati) गोविंद बाग या निवासस्थानी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी दाखल झाले आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत आज विविध संस्थांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यात त्यांना रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रोबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना शरद पवार यांनी अधिक भाष्य करणं टाळलं. बारामती अॅग्रो प्लांटवरील कारवाईवर सध्या बोलणार नाही, असं ते म्हणाले.

रोहित पवारांना नोटीस, बारामती अॅग्रोचे दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना

दरम्यान, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने आमदार रोहित पवार यांना मध्यरात्री नोटीस देत बारामती ॲग्रोचे दोन प्लांट बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. यासाठी रोहित पवार यांना मंडळाकडून 72 तासांची मुदत देखील देण्यात आली आहे. या नोटिसीमध्येआपण सत्याच्या बाजूने आहोत आणि केवळ राजकीय सुडापोटी ही कारवाई होत असल्याने माझ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आणि कुटुंबाने काळजी करण्याची गरज नाही. माझ्या वाढदिवसानिमित्त 'गिफ्ट' दिल्याबद्दल सरकारचे आभार मानतो, परंतु राज्यातली युवा आणि जनता सरकारला नक्कीच 'रिटर्न गिफ्ट' देईल, ही खात्री आहे. असो! पण सर्वसामान्यांच्या कामाला महिनोन्-महिने सुस्ती दाखवणारी यंत्रणा या दोन नेत्यांच्या इच्छेसाठी माझ्यावर कारवाई करताना खूप तत्परता दाखवते, याचा मात्र नक्कीच आनंद आहे. या सर्व प्रक्रियेत शासकीय अधिकाऱ्यांना मी कुठलाही दोष देत नाही. न्यायव्यवस्थेवर माझा पूर्ण विश्वास असून सत्याच्या आधारे न्यायालयात माझा लढा सुरूच राहील." , असं रोहित पवार म्हणाले आहेत.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल