मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या तरुणाची आत्महत्या

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. सुनील कावळे 45 वर्ष अस आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रुतगती महामार्गावरील उड्डाणपुलावर गळफास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे.आत्महत्या करणारा हा तरुण मुळाचा अंबड तालुक्यातील असून त्याचे पार्थिव उत्तरीय तपासणीसाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठी केलेल्या केलेल्या या आत्महत्येमुळे आता राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे.काही दिवसांपुर्वी मराठा आरक्षणासाठी तरुणाने केली होती आत्महत्या

मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण असतानाच धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील माडज येथील एका मराठा तरुणाने आरक्षणाच्या मागणीसाठी गावातील शिवकालीन वैजनाथ महाराज तलावात उडी घेऊन आत्महत्या केली होती.
महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरकारने आरक्षण दिलं पाहिजे यासाठी मनोज जरांगे यांनी लढा उभारला आहे. त्यांना राज्यभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारला आरक्षणावर विचार करून कृती करण्यासाठी दिलेली मुदत संपत आली आहे, सरकार कोणता निर्णय घेणार याकडे संपुर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल