बार्शी 246 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय गोदामाला छावणीचे स्वरूप

बार्शी 246 विधानसभा मतदारसंघातील मतमोजणी शासकीय गोदामाला छावणीचे स्वरूप 

KDM NEWS बार्शी विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणूक प्रक्रियेमधील अंतिम टप्पा असलेल्या मतमोजनीला शनिवारी (दि. २३) सकाळी सुरुवात होत आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानाची प्रक्रिया २० नोव्हेंबरला पार पडली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत बार्शी विधानसभेचा अधिकृत निकाल हाती येणार आहेत. निवडणूक यंत्रात बंद झालेले उमेदवाराचे नशीब ठळक होणार आहे. शनिवारी होणाऱ्या मतमोजणीची तयारी प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आलेली आहे.

बार्शीतील उपळाई रोड भागातील शासकीय धान्य गोदाम येथे ही मोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. यासाठी मांडव तसेच बरिकेडिंगचे काम पूर्ण झाले आहे. ही मतमोजणी १४ टेबलद्वारे पूर्ण केली जाणार असून यांसाठी २४ फेऱ्या ठेवण्यात आलेल्या आहेत. या कामी २४ मतमोजणी पर्यवेक्षक, २४ मतमोजणी सहाय्यक,

१४ टेबल मशिन मोजणीचे आणि १० टेबल पोस्टल मतमोजणीचे असणार आहेत. असे एकूण १५० कर्मचारी मतमोजणीत प्रत्यक्ष सहभागी असणार आहेत अप्रत्यक्ष पणे १२० च्या वर कर्मचारी या कामी असणार आहेत. या पूर्ण गोडावूनला सी.सी.टी.व्ही. बसवण्यात आलेले असून याचा एक अक्सेस सोलापूर येथील नियंत्रण कक्षास देण्यात आलेला आहे. यासाठी तहसील प्रशासनासह पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत. या भागात कलम १४४ लागू केले असून हा भाग मोबाईल प्रतिबंधित म्हणून घोषित केला आहे. या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या ओळख पत्रा शिवाय कोणालाही आत येण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रमोद गायकवाड आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी एफ आर शेख यांनी दिली.

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

**ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाने घेतला तिघांचा बळी; धाराशिवच्या बावी गावात कुटुंबाचा करुण अंत**

**बार्शीत १३ वर्षीय मुलाचे अपहरण; पोलिसांचा शोध सुरू**

मुख्याध्यापकांची निर्दोष मुक्तता: बार्शी न्यायालयाचा निकाल